Bigg Boss 17 | सुशांतचं नाव ऐकताच विकी जैन भडकला, अंकिताला खडसावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बरीच वर्ष नात्यात होते. मात्र नंतर काही कारणांमुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. सुशांतच्या निधनानंतर अंकिताने विकी जैनसोबत (Vicky Jain) आपला संसार थाटला. या जोडप्याचा सुखी संसार चालू असतानाच त्यांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) सामील होताच अंकिता आणि विकी यांच्यात प्रचंड भांडण झाली. रोज काही न काही कारणांमुळे यांच्यात वाद होत आहेत. त्यातच अंकिता सतत सुशांतबद्दल बोलत असते. आता या सर्व प्रकरणावर विकी जैन याने भाष्य केलं आहे. अंकिता आणि सुशांतच्या नात्याचा परिणाम मला भोगावा लागला असल्याचं विकी म्हणाला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

Bigg Boss 17 | विकी जैन नेमकं काय म्हणाला?

बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये या आठवड्यात’विकेंड चा वार’ हा करण जोहरने होस्ट केला. यात त्याने सगळ्यांचाच क्लास घेतला. त्यात विकी जैनला करणने काही प्रश्न केले. ‘नॅशनल टीव्हीवर तुझी आई अंकिताला बर-वाईट बोलत असताना तू तुझ्या बायकोसाठी स्टँड का नाही घेतलास?’, असा सवाल करणने केला. यावर विकी जैनने करण जोहरची माफी मागितली.

मात्र, करण गेल्यानंतर त्याने आपली पत्नी अंकिता लोखंडेवर आपली सर्व भडास काढली. ‘माझ्या कुटुंबाने तुला कधीही कशासाठी थांबवलं नाही, आपल्या लग्नानंतर दहा दिवस देखील कुटुंबासोबत नाही राहिलीस. यावरही माझं कुटुंब तुला काही म्हटलं का?, असा सवाल विकी जैनने अंकिताला केला.

मी तुझ्या आयुष्यात आलो तेव्हा चारी बाजूंनी फक्त सुशांतचा मुद्दा चालू होता. सगळीकडे तुमच्या नात्याची चर्चा सुरू होती. या सर्व गोष्टींचा परिणाम मला भोगावा लागला आहे. ही सर्व मी माझ्यावर घेतले. तुला माझ्याशी एवढीच अडचण होती, तर तु माझ्याशी लग्न का केलंस?, असा संताप विकी जैनने व्यक्त केलाय. यानंतर अंकिताने लगेच त्याला सॉरीही म्हटलं. यावर विकीने अंकिताला ‘एक सॉरी बोलून सगळं काही ठीक होत नाही’, असं म्हटलंय.

Bigg Boss 17 | अंकिताच्या आईने दिला होता सल्ला |

बिग बॉसच्या (Bigg Boss 17) फॅमिली स्पेशल वीकमध्ये वंदना लोखंडे यांनी सहभाग घेतला होता. याचदरम्यान त्यांनी अंकिताला सुशांतबद्दल मोठा सल्ला दिला होता. अंकिताने पती विकीसोबत आदराने वागायला हवं. टीव्हीवर असं सर्वांसमोर भांडणं हे त्यांच्या नात्याबद्दल चुकीचा संदेश देत आहे. याचा दोन्ही कुटुंबावर परिणाम होत आहे. त्यातच सतत सुशांतचा उल्लेख करणं विकीच्या कुटुंबाला आवडत नाही. त्यामुळे अंकिताने सुशांतबद्दल बोलणं बंद करावं, असा सल्ला वंदना लोखंडे यांनी आपल्या लेकीला दिला आहे.

आई वंदना लोखंडे यांचा सल्ला अंकितानेही स्वीकार केला. आईचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अंकिताने सर्व प्रकरणाचा खुलासा केला. मी सुशांत बद्दल कधीच बोलली नाही. मुनव्वर आणि अभिषेक मला सतत त्याच्याबद्दल विचारत असतात. मी फक्त त्यांना सांगत असते, असं अंकिता म्हणाली होती. तसेच, ‘यापुढे मी सुशांतचा उल्लेख करणार नाही किंवा असे काहीही बोलणार नाही ज्याचा माझ्या कुटुंबाला त्रास होईल.’, असेही अंकिता म्हणाली होती. मात्र, विकी जैननेही सुशांतबदल बोलून दाखवल्याने आता पुन्हा यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल

Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु

Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा

Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!