Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. भाजप या कार्यक्रमाचा राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे, तर सत्ताधारी भाजप रामद्वेष म्हणत विरोधकांचा समाचार घेत आहे. अशातच बिहारचे पर्यटन मंत्री तेजप्रताप यादव यांनी एक अजब दावा केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू यादवांचे चिरंजीव तेजप्रताप यांनी अयोध्येत श्री राम येणार नसल्याचे म्हटले आहे.

तेजप्रताप यादवांचा दावा

राजद नेते आणि बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव आणि राबडी यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की त्यांच्या स्वप्नात प्रभू श्री राम आले होते. तसेच ते 22 जानेवारीला अयोध्येत येणार नसल्याचे तेजप्रताप यांनी सांगितले.

Ram Mandir अन् राजकारण

एका सभेला संबोधित करताना तेजप्रताप यादव म्हणाले की, प्रभू रामाचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. निवडणुका आल्या की प्रभू श्रीरामाला पुढे केले जाते आणि निवडणुका संपल्या की लगेच दूर करतात. भगवान श्रीराम 22 जानेवारीलाच अयोध्येत येतील का? मी म्हणतो नाही, होय ते माझ्या स्वप्नात आले होते. भगवान श्रीराम माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी स्वतः सांगितले की ते त्या दिवशी अयोध्येला येणार नाहीत.

तेज प्रताप यादव यांच्या संघटनांपैकी एक असलेली धर्मनिरपेक्ष सेवक संघ (DSS) ही एक संघटना आहे. तेज प्रताप यादव म्हणतात की, त्यांनी RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर देण्यासाठी DSS ची स्थापना केली आहे. तेज प्रताप यादव यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी याच डीएसएस परिषदेचे आयोजन केले होते.

श्री राम माझ्या स्वप्नात आले होते – तेजप्रताप यादव

तेज प्रताप यादव त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी दावा केला की, भगवान श्री राम त्यांच्या स्वप्नात आले होते. ते त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की मी 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही. ते म्हणाले की, भाजपचे लोक खोटे दावे करत आहेत. चारही शंकराचार्यांच्या स्वप्नातही भगवान श्रीराम दिसले होते, असेही तेजप्रताप यांनी सांगितले.

तसेच तेज प्रताप यादव म्हणाले की, संपूर्ण देशात प्रचंड थंडी आहे. देशात एवढी थंडी, कुठून येते? मोदीजींनी ते करून दाखवले, त्यामुळे गरीब जनता त्रस्त झाली आहे. त्यांनी त्यांच्या एका समर्थकाला विचारले की जर एवढी थंडी असेल तर ते पुढे लढाई कशी लढायची. निवडणुका आल्या की कोरोना आजार येतो अन् निवडणुका संपल्या की रोगराईही संपते, अशा शब्दांत तेजप्रताप यांनी भाजप सरकावर टीकास्त्र सोडले.

 महत्त्वाच्या बातम्या –

Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!

Crossed Check l बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो

Ram Mandir | राम मंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Gold Rate Today l संक्रातीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त