Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Makar Sankranti 2024 | सर्वत्र मकर सक्रांतीच्या सणाचा उत्साह आहे. तिळगूळ वाटून नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी देखील हा सण साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला सूर्य उपासनेचा महान सण असे म्हटले जाते. खरं तर मकर संक्रांतीसोबत खरमास संपते आणि या दिवसापासून सूर्यदेव आपल्या तेजाने वावरू लागतात, अशी ख्याती आहे. याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात.

मकर सक्रांतीचा सर्वत्र उत्साह

यंदा आज म्हणजेच सोमवारी 15 तारखेला मकर संक्रांतीचा मोठा सण साजरा केला जात आहे. मकर सक्रांतीच्या सणाविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना आहेत. पण, असे मानले जाते की या सणादिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला येतात. या सणाशी सूर्य आणि शनीचा संबंध असल्याने या सणाला खूप महत्त्व आहे.

तसेच याच सुमारास शुक्राचा उदय होतो, त्यामुळे शुभ कार्ये येथून सुरू होतात. ग्रामीण भागात आजच्या दिवशी शुभ कार्ये करण्यावर लोकांचा भर असल्याचे आजही पाहायला मिळते. 15 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच आज मकर संक्रांतीच्या दिवशी तब्बल 77 वर्षांनंतर वरियान योग आणि रवि योगाचा संयोग बनत आहे. या दिवशी बुध आणि मंगळ देखील एकाच राशीत धनु राशीत असतील.

Makar Sankranti 2024 चे योग

वरियान योग – 15 जानेवारी रोजी हा योग पहाटे 2.40 ते रात्री 11.11 पर्यंत राहील.
रवियोग – 15 जानेवारी रोजी सकाळी 07.15 ते 08.07 पर्यंत असेल.
सोमवार – पाच वर्षांनंतर सोमवारी मकर संक्रांत आली आहे. अशा स्थितीत भाविकांना सूर्यासोबतच शिवाची कृपा प्राप्त होईल.

मकर सक्रांतीचा शुभ मुहुर्त (Makar Sankranti 2024 Shubh Muhurat)

उदय तिथीनुसार, यंदा 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती साजरी केली जात आहे. या दिवशी सूर्य दुपारी 2.54 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांती पुण्यकाल सकाळी 07.15 ते संध्याकाळी 06.21 पर्यंत असेल तर, मकर संक्रांती महा पुण्यकाल हा सकाळी 07.15 ते सकाळी 09.06 पर्यंत असणार आहे.

मकर सक्रांतीच्या पूजेचा विधी

मकर सक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. सूर्यदेवाला गंधरस आणि धूप अर्पण करून नमस्कार करावा. त्यानंतर सूर्यदेवाच्या नावाने दिवा लावावा. त्यानंतर सूर्यदेवाला उडीद खिचडी आणि तिळाचे लाडू अर्पण करून गरिबांना दान करावे. तांब्याच्या भांड्यात पाण्यात काळे तीळ आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला ते अर्पण करावे. हरिवंश पुराणाचा पाठ करा. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. सूर्याला लाल फुले आणि अक्षता घालून अर्घ्य अर्पण करावे. सूर्य बीज मंत्राचा जप करा. विशेष बाब म्हणजे संध्याकाळी अन्न सेवन करू नका.

महत्त्वाच्या बातम्या –

Rohit Sharma ला वाटली स्वतःची लाज!, दुसऱ्याच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर…

Driving Licence l घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? अशाप्रकारे करा अर्ज

IND vs AFG | रेलिंग ओलांडून घुसला मैदानात, विराटला मारली मिठी; पण पुढं पोलिसांनी…

iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, 25-30 हजार बजेट असणाऱ्यांच्या आला टप्प्यात!

Pune News | पुण्याच्या हवामानाला झालंय काय?; मोठी माहिती समोर