Driving Licence l घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? अशाप्रकारे करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Driving Licence l आजकाल ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड हे कागदपत्र महत्त्वाचे मानले जाते. ड्रायव्हिंग लायसन्स असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवता येतात. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) नसेल आणि तुम्हाला ते काढायचे असेल तर आता कुठे कार्यालयात किंवा कुठे रांगेत उभा राहायची गरज भासणार नाही. कारण आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढता येऊ शकते.

तुम्हालाही लर्निंग लायसन्स घ्यायचे असेल तर आता यासाठी आरटीओला जाण्याची गरज नाही. भारत सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया डिजिटल केली आहे. लर्निंग लायसन्ससाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. कायमस्वरूपी परवान्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर कसे काढायचे ते सविस्तर पाहुयात…

Driving Licencel ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

– लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर राज्य पर्याय निवडावा. यानंतर संपूर्ण यादी तुमच्या (Driving Licence) समोर येईल. त्यातून तुम्हाला शिकाऊ परवान्याचा पर्याय निवडावा लागेल.
– लर्नर लायसन्सच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधारचा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डचू माहिती भरावा लागेल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

– यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल आणि पेमेंट करावे.
– तुमचा लर्निंग लायसन्स या प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यानंतर सुमारे 7 दिवसांच्या आत तुमच्या घरच्या पत्त्यावर लर्निंग लायसन्स पोहोच होईल.
– मात्र कायमस्वरूपी परवाना घ्यायचा असेल तर आरटीओ कार्यालयात जावे लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीचे कागदपत्र (Driving Licence Documents) :

आधारकार्ड
मतदानकार्ड
रहिवासी दाखला
जन्मतारीख प्रमाणपत्र (दहावी मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र)
पॅनकार्ड
रेशनकार्ड
वीज बिल
पासपोर्ट फोटो
स्वाक्षरी
मोबाईल क्रमांक

महत्त्वाच्या बातम्या –

IND vs AFG | रेलिंग ओलांडून घुसला मैदानात, विराटला मारली मिठी; पण पुढं पोलिसांनी…

iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, 25-30 हजार बजेट असणाऱ्यांच्या आला टप्प्यात!

Pune News | पुण्याच्या हवामानाला झालंय काय?; मोठी माहिती समोर

‘या’ खेळाडूमध्ये Yuvraj Singh ला दिसते स्वतःची झलक!

WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर घालणार धुमाकूळ!