IND vs AFG | रेलिंग ओलांडून घुसला मैदानात, विराटला मारली मिठी; पण पुढं पोलिसांनी…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AFG | भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना इंदूर येथे खेळवला गेला. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने या सामन्यातून मोठ्या कालावधीनंतर भारताच्या ट्वेंटी-20 संघात पुनरगामन केले. रविवारी झालेल्या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. सामना सुरू असताना किंग कोहलीचा एक चाहता सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसला अन् विराटला भेटला.

विराट कोहलीच्या या उत्कट चाहत्याने होळकर स्टेडियमच्या मैदानात क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला मिठी मारली. चाहता मैदानात आल्याचे कळताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली आणि त्याला पकडले. मैदानातून बाहेर काढल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन तुकोगंज पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. संबंधित चाहत्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

IND vs AFG भारताची विजयी आघाडी

अधिकाऱ्याने आणखी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युवकाकडे सामन्याचे तिकिट असून तो नरेंद्र हिरवाणी गेटमधून होळकर स्टेडियममध्ये दाखल झाला. तो कोहलीचा मोठा चाहता आहे आणि म्हणूनच त्याने कसलाही विचार न करता प्रेक्षक गॅलरीतून मैदानात धाव घेतली. तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत असून चौकशीच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.

दुसऱ्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 26 चेंडू आणि 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकांत सर्व गडी गमावून 172 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ज्याचा पाठलाग भारताने 15.4 षटकात चार गडी गमावत केला. तिसरा आणि अंतिम सामना 17 जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

IND vs AFG जैस्वाल-दुबेचा सुपर शो

यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी स्फोटक खेळी करून सामना एकतर्फी केला. दुबेने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. प्रथम गोलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी लहान मैदानाचा फायदा घेतला. पण, भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी पटकावले अन् पाहुण्यांना सन्मानजनक धावसंख्येपर्यंत रोखले. प्रत्युत्तरात, 34 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 68 धावा करणारा यशस्वी जैस्वाल आणि 32 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 63 धावा करणारा शिवम दुबे हेच भारताच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले.

मात्र, चार षटकांत 17 धावा देत दोन बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. विराट कोहलीने 16 चेंडूत 29 धावा करून सावध खेळी केली. मागील14 महिन्यांतील पहिला ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत असताना त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही.

 महत्त्वाच्या बातम्या –

iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, 25-30 हजार बजेट असणाऱ्यांच्या आला टप्प्यात!

Pune News | पुण्याच्या हवामानाला झालंय काय?; मोठी माहिती समोर

‘या’ खेळाडूमध्ये Yuvraj Singh ला दिसते स्वतःची झलक!

WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर घालणार धुमाकूळ!

iPhone 15 तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त, आता फक्त एवढे रुपये भरा आणि घरी आणा!