Pune News | गेल्या दोन दिवसात ऐन हिवाळ्यात राज्यात पुन्हा पावसाचे ढग दाटून आले. तसेच अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला. पुण्यात देखील हवामानात (Pune News) सतत बदल होत असल्याचं दिसतंय. कधी थंडी कधी पाऊस तर कधी उकाडा जाणवतोय. अशात हवामानाबाबत मोठी माहिती समोर आलीये. भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राद्वारे 19 जानेवारीनंतर थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
पुण्याच्या हवामानाबाबत मोठी माहिती समोर
सकाळी आणि सायंकाळी हवेत गारठा असेल, दुपारी उष्णता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढले असून, ते 29 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात कायम आहे. परिणामी राज्यासह दक्षिण भारत व मध्य भारतापर्यंत हवामानात बदल होतील. थंडीची लाट राज्यातील विविध भागात जाणवेल आणि तापमान कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Pune News | थंडीची लाट जाणवेल
19 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान या कालावधीत राज्यभरातील तापमान किमान तापमानापेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तसेच पुढील उन्हाळी हंगामात अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे तापमान वाढल्यास अवकाळी व अवेळी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुण्यात (Pune News) 18 जानेवारीनंतर आकाश निरभ्र राहील. पुणे आणि परिसरात 48 तासांत आकाश कोरडे राहील. सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आहे. हिवाळ्यातही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूमध्ये Yuvraj Singh ला दिसते स्वतःची झलक!
WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर घालणार धुमाकूळ!
iPhone 15 तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त, आता फक्त एवढे रुपये भरा आणि घरी आणा!
Shaun Marsh | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर; दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती
कार घेणार असाल तर ही बातमी वाचा; Hyundai ने दिली मोठी गुड न्यूज