Shaun Marsh | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर; दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shaun Marsh | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शॉन मार्शने (Shaun Marsh) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो सध्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणार आहे. शॉर्न त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा व्यावसायिक क्रिकेट सामना खेळणार आहे.

शॉन मार्शने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

मार्शने कारकिर्दीतील शेवटचा सामना सिडनी थंडरच्या विरोधात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. हा सामना 17 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याच्या आधी ऍरॉन फिंचने शनिवारी रेनेगेड्ससाठी शेवटचा व्यावसायिक क्रिकेट सामना खेळला. त्याला या सामन्यात खातंही उघडता आलं नाही.

बीबीएलमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससाठी सर्वाधिक धावा करणारे शॉर्न मार्श (Shaun Marsh) आणि फिंच हे टॉप-3 फलंदाज आहेत. फिंच 3311 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर शॉन मार्श 1375 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विक्रमात सॅम हार्पर 1433 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मार्श 2019-2020 मध्ये रेनेगेड्स संघात सामील झाला आणि त्यापूर्वी तो पर्थ स्कॉचर्स संघाचा भाग होता. मार्शने रविवारी निवृत्तीची घोषणा केली आणि सांगितलं की 17 जानेवारी रोजी होणारा सिडनी थंडर्सविरुद्धचा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा व्यावसायिक सामना असेल.

शॉन मार्शची आयपीएल कारकिर्द दिमाखदार होती. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज या संघासाठीच खेळला. पूर्वी या संघाचं नाव किंग्ज इलेव्हन पंजाब असे होतं. आयपीएलमध्ये त्याने 2008 साली पदार्पण केले होते.

Shaun Marsh ने पहिली ओरेंज कॅप पटकवलेली

मार्शने आयपीएलमध्ये 71 सामने खेळले. त्याने 2477 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 1 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. 115 धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला आयपीएलमध्ये पहिली ऑरेंज कॅप मिळाली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. आयपीएलनंतर त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 संघात निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या- 

कार घेणार असाल तर ही बातमी वाचा; Hyundai ने दिली मोठी गुड न्यूज

Shruti Marathe | ‘तू माझ्यासोबत झोपली तर…’; श्रुती मराठेचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Bigg Boss 17 | सुशांतबद्दल बोलू नकोस, कारण तुझ्या सासरचे… अंकिताला आईचा मोठा सल्ला

Team India | भारतीय संघाच्या भल्यासाठी काम करायचंय; Yuvraj Singh ने मागितलं महत्त्वाचे पद

Congress ला मुंबईत मोठं खिंडार; माजी खासदार Milind Deora यांचा पक्षाला जय महाराष्ट्र!