Rohit Sharma ला वाटली स्वतःची लाज!, दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma । सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात शून्यावर धावबाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचा संताप पाहायला मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहित मोठी खेळी करेल असे अपेक्षित होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात देखील रोहितला खाते उघडता आले नाही अन् त्याचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला. रोहित शर्माला सलग दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात खातेही उघडता आले नाही.

रोहित 14 महिन्यांनंतर टीम इंडियासाठी ट्वेंटी-20 संघात पुनरागमन करत आहे, मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला एकही धाव करता आली नाही. अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा सामना रोहित शर्माचा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 150 वा सामना होता. रोहितला फजल हक फारुकीने बाद केले. या सामन्यात फजलहक फारुकी अफगाणिस्तानच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. यशस्वी जैस्वालने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून भारताचे खाते उघडले.

भारताचा मोठा विजय

पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उसळी घेईल या आशेने हिटमॅनने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण, फजलहक फारुकीने ज्या वेगाने चेंडू टाकला तो पाहता चेंडूने उसळी घेतली नाही अन् तो खाली राहिला. याचा परिणाम असा झाला की रोहित शर्माचा शॉट पूर्णपणे चुकला आणि त्याचा त्रिफळा उडाला. रोहितला पहिल्याच चेंडूवर तंबूत परतावे लागले.

Rohit Sharma चा उडाला त्रिफळा

मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलसोबत सलामी करताना रोहित शर्मा धावबाद झाला होता. पहिल्या सामन्यात गिलच्या चुकीमुळे भारतीय कर्णधाराला शून्यावर बाद व्हावे लागले होते. त्या सामन्यात रोहितने मिड ऑफच्या दिशेने फटका मारला पण दुसऱ्या टोकाला असलेला गिला चेंडूकडेच पाहत राहिल्याने रोहितला धावबाद व्हावे लागले. अशा स्थितीत दोन्ही खेळाडू समान टोकाला पोहोचले होते. पण, दुसऱ्या सामन्यात मात्र गोलंदाजाने रोहितला पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवले.

दरम्यान, ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 150 वा सामना खेळत असलेल्या हिटमॅनला खास दिवशी काहीच खास करता आले नाही. भारताविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही.

मात्र यानंतर गुलबदिन नायबने उत्कृष्ट अर्धशतक झळकावत अफगाणिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावांचे मजबूत लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तान संघाची ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. पण यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या जोडीने सामना एकतर्फी केला अन् भारताने सहा गडी राखून विजय साकारला.

महत्त्वाच्या बातम्या –

Driving Licence l घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? अशाप्रकारे करा अर्ज

IND vs AFG | रेलिंग ओलांडून घुसला मैदानात, विराटला मारली मिठी; पण पुढं पोलिसांनी…

iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, 25-30 हजार बजेट असणाऱ्यांच्या आला टप्प्यात!

Pune News | पुण्याच्या हवामानाला झालंय काय?; मोठी माहिती समोर

‘या’ खेळाडूमध्ये Yuvraj Singh ला दिसते स्वतःची झलक!