Ram Mandir | राम मंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. केंद्र सरकारसह सर्व राज्यातील सरकारं आपापल्या परीने यात सहभाग नोंदवत असून महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. काही राज्यांमध्ये 22 तारखेला शैक्षणिक संस्थानांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक मोठा निर्णय घेत 22 जानेवारीला मध्य प्रदेशात ड्राय डे असेल अशी घोषणा केली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी हा आदेश दिला आहे.

22 तारखेला दारूबंदी

मध्य प्रदेशात 22 जानेवारीला दारूबंदी असणार आहे. या दिवशी राज्यभरातील वाईन शॉप्स बंद राहणार आहेत. याशिवाय अनेक जिल्ह्यांत कलश यात्रा, रामलीला, प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. 22 जानेवारीला मंदिरांसह घरोघरी दिवे लावले जातील. पुढच्या सोमवारी अयोध्येतील श्री राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. त्या दृष्टीने देशभरात महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भोपाळमध्ये हिंदू उत्सव समितीच्या वतीने धर्मध्वज यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा भवानी चौक येथून सोमवारपासून सुरू होऊन शहरातील विविध भागातून जाणार आहे. यात्रेदरम्यान फटाक्यांची आतषबाजीही होत असल्याचे पाहायला मिळाले.

Ram Mandir अन् राजकारण

दुसरीकडे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजप या कार्यक्रमाचा राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. भोपाळमध्ये हिंदू संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी भवानी चौकातून धर्मध्वजा यात्रेला सुरुवात होणार आहे.

तेथील भगवान श्रीरामाची पूजा केली जाईल आणि धार्मिक ध्वज समर्पित केला जाईल. त्याचबरोबर भोपाळ येथील गायत्री मंदिरात 2400 दिवे लावून आरती करण्यात येणार आहे. राज्यातील जनतेचा उत्साह पाहता उद्घाटनाच्या दिवशी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले.

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेक दिनी मध्य प्रदेश सरकार सुट्टी जाहीर करू शकते. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. राज्यातील पंचायतींमध्ये एक आठवडा राम कथा सप्ताह साजरा केला जाणार आहे. 21 जानेवारीपर्यंत राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Gold Rate Today l संक्रातीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त

Rohit Sharma ला वाटली स्वतःची लाज!, दुसऱ्याच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर…

Driving Licence l घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? अशाप्रकारे करा अर्ज

IND vs AFG | रेलिंग ओलांडून घुसला मैदानात, विराटला मारली मिठी; पण पुढं पोलिसांनी…