Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Cricket News | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फलंदाजी म्हणजे क्रिकेट विश्वासाठी पर्वणीच… क्रिकेटच्या मैदानात असामान्य कामगिरी करणारा शिलेदार म्हणून सचिनची ओळख आहे. क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे शतक झळकावणारा सचिन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्तेत असतो. आता क्रिकेटचा देव पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे त्याचा सहकारी युवराज सिंग देखील त्याच्यासोबत मैदानात असेल.

चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगची झलक पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही स्टार्स 18 जानेवारी रोजी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई ग्राम येथे होणाऱ्या ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’मध्ये सहभागी होणार आहेत. एका संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करणार आहे, तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व युवराज सिंगकडे असेल.

सचिन-युवी पुन्हा एकदा मैदानात

सचिन-युवीसह इतरही शिलेदार या स्पर्धेत झळकणार आहेत. या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन ‘श्री मधुसूदन साई ग्लोबल परोपकारी सेवा अभियान’तर्फे केले जात आहे. सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’मध्ये सात देशांतील अनेक नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत.

सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा माजी फिरकीपटू आणि विद्यमान खासदार हरभजन सिंग, श्रीलंकेचा माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरन, भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण, माजी श्रीलंकन खेळाडू चामिंडा वास, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग, माँटी पानेसर, डॅनी मॉरिसन आणि व्यंकटेश प्रसाद सहभागी होणार आहे.

Cricket News : 18 जानेवारीला थरार

या सर्व शिलेदारांनी आपल्या काळात आपापल्या देशासाठी देदीप्यमान कामगिरी करून देशाचा गौरव केला. कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील साई कृष्णन स्टेडियमवर हा थरार रंगेल. या स्टेडियमची एकूण 3,500 प्रेक्षक क्षमता आहे गॅलरीच्या मध्यभागी असलेला स्टेज खेळाडूंच्या पहिल्या गटाचे स्वागत करेल, जे क्रिकेटच्या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम’ला आपला पाठिंबा देण्यासाठी एकत्र जमतील.

या सामन्याची विशेष बाब म्हणजे 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील काही निवडक खेळाडू प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी या स्पर्धेबद्दल बोलताना समाधान व्यक्त केले. खेळ अशी एक गोष्ट आहे, जी सर्वांना एकत्रित आणण्याचे काम करते असे त्यांनी नमूद केले.

 महत्त्वाच्या बातम्या –

Crossed Check l बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो

Ram Mandir | राम मंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Gold Rate Today l संक्रातीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त

Rohit Sharma ला वाटली स्वतःची लाज!, दुसऱ्याच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर…