Fighter Trailer | ‘फायटर’ चा ट्रेलर रिलीज; ऋतिक-दीपिका नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची एंट्रीच भाव खाऊन गेली

Fighter Trailer | अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा बहुचर्चित ‘फायटर’ (Fighter Trailer ) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 3 मिनट, 23 सेकेंडच्या या ट्रेलरमध्ये दीपिका आणि ऋतिक यांची दमदार अभिनय आणि केमिस्ट्री दिसून आली.

10 जानेवारीरोजी ऋतिकच्या वाढदिवशी फायटरच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर (Fighter Trailer ) केव्हा रिलीज होणार, याची घोषणा केली होती. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आज (15 जानेवारी) संपली आहे. आज 12 वाजता चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मात्र यात मुख्य भूमिकेत असलेले ऋतिक दीपिका नव्हे तर अभिनेते अनिल कपूर यांच्या एंट्रीचीच अधिक चर्चा होत आहे.

Fighter Trailer | ‘या’ तारखेला रिलीज होणार ‘फायटर’

‘दुनिया मे मिल जाएंगे आशिक कई, पर वतन से हसीन सनत नही होता. हीरो मे समटकर, सोने मे लपटकर मरते हे कई.. पर तिरंगेसे खूबसूरत कफन नही होता हे’, या सुंदर डायलॉगने चाहत्यांचे मन जिंकले आहे. ट्रेलरची सुरुवात दीपिका आणि ऋतिकच्या एंट्रीने होते. तर, अभिनेते अनिल कपूर यांची धमाकेदार एंट्री भाव खाऊन जाते. अनिल कपूर यात लीडरच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा निडर रोल आणि डायलॉग (Fighter Trailer) चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि ऋतिक यांच्या डायलॉगमुळे चित्रपट नक्कीच हीट ठरेल, असे म्हटले जात आहे. ट्रेलरमधूनच प्रत्येकाची देशभक्ती जागी होईल, असे सीन दाखवण्यात आले आहेत. चित्रपटातील गाणी तर अगोदरच चर्चेत आहेत. मात्र, आता ट्रेलरनेही धुमाकूळ घातला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

यात भारत पाकिस्तान युद्धाची एक झलक दाखवण्यात आली आहे. मिसाईल युद्ध ते डायलॉग यामुळे ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे चाहते आतापासूनच चित्रपटाची बुकिंग करतील, असे दिसून येत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Fighter Trailer | ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या (Fighter Trailer ) या चित्रपटात दीपिका पादुकोणने मिनल राठोड उर्फ मिन्नी यांची भूमिका साकारली आहे. तर, ऋतुक रोशनने शमशेर पठानिया उर्फ पैटी यांची भूमिका केली आहे. दीपिका आणि ऋतिक रोशन यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूरही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनिल कपूर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ ​​रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय करण सिंह ग्रोवर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

Business Ideas l तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हे 5 व्यवसाय; आठवड्याला कमवाल हजारो रुपये

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल

Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु

Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा