अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा आला समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

नवी दिल्ली | गँगस्टरमधून राजकारणी बनलेला अतिक अहमद (Atik Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली आहे. त्याला प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

या घटनेनंतर प्रयागराजमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर आता त्यांच्या मालमत्तेचा वारस कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याची मालमत्ता कुठे कुठे आणि किती आहे.

अतीक अहमदने 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं की त्यांच्याकडे 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. ज्यामध्ये त्यांच्या नावावर 180,20,315 आणि पत्नीच्या नावावर 81,32,946 रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्याच वेळी, त्याच्या नावावर 19 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता होती, ज्यात जमीन, अनेक आलिशान राजवाडे आणि फार्म हाऊसचा समावेश होता.

अतिक अहमद यांच्या मृत्यूनंतर त्याची चार मुलं कोट्यवधींच्या संपत्तीचे वारस असतील. त्यांची दोन अल्पवयीन मुले फरार असून त्यांची पत्नीही फरार आहे. सध्या सर्व मालमत्ता पत्नी पाहत असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-