‘येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात…’; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

पुण्यात एका पुस्तक प्रकाशनानिमित्त प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आले होते. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात तसेच देशात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हे मोठे बॉम्बस्फोट असतील. राजकारणात दोन बॉम्बस्फोट होणार आहेत, असा दावा त्यांनी केलाय.

नेमकं काय घडेल हे मी आत्ताच सांगणार नाही. 15 दिवसांनंतर आपण भेटू तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-