Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

पुणे | अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस (Teacher Recruitment) प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. अशात शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का

अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीमध्ये (Teacher Recruitment) आता पुन्हा दहा टक्के जागा कमी भरल्या जाणार असल्याने निर्णयाविराेधात उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. पवित्र पाेर्टलवर जाहिरात देताना 80 ऐवजी 70 टक्के रीक्त पदांची मागणी करावी, अशी नव्याने सुचना शिक्षण आयुक्तांनी सीईओंना केली आहे.

जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावलीतील रिक्त आणि कार्यरत पदांवर नागपूर अधिवेशनात आमदार गोपिचंद पडळकर यांनी आक्षेप घेत लक्षवेधी मांडली. त्यासाठी सर्व माहिती घेऊन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनाही नागपूरला बोलावून घेण्यात आलं होतं. त्यासंदर्भातील बैठक मंगळवारी पार पडली.

Teacher Recruitment | रिक्त जागांच्या 70 टक्के पदांची जाहिरात येणार

जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीपूर्वी ‘टेट’ पार पडली. त्यानंतर शिक्षक भरतीसाठी जवळपास अडीच लाख उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. भरतीसंदर्भातील न्यायालयीन तिढा सुटल्यानंतर आता भरतीला सुरवात होईल, अशी आशा होती. पण, आता ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पाडला जात आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होईल.

शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. तरीपण, पुढील आठवड्यात शालेय शिक्षण विभागाकडून भरतीसंदर्भातील स्वतंत्र आदेश निघतील, अशी माहिती आहे. विविध कारणांमुळे अगोदरच लांबलेली शिक्षक भरती, पुन्हा लांबणीवर नको, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज

PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार