Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील वातावरणामध्ये (Weather Update) मोठे बदल झाले आहेत. आता येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे.

Weather Update | थंडीबाबत हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

ख्रिसमसदरम्यान महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे 48 तासांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीचा कडाका जाणवू शकतो.

Weather Update | थंडी वाढणार?

आज 20 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. यासोबतच पुढील सहा दिवस राज्यात कोरडं हवामान राहिल. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात जाणवताना दिसणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसात महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी 25 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडं दिसून येईल.

मंगळवारी सकाळी नागपुरात यंदाच्या मोसमातील नीचांकी ९.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच गोंदिया व यवतमाळ येथे राज्यातील निचांकी ९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

दरम्यान, देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरस्थितीमुळे रेल्वे सेवेसह राज्यातील दळणवळण सेवाही विस्कळीत झाली आहे. दक्षिण रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार

TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!