Radhakrishna Vikhe Patil | महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार?, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नागपूर | महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मितीच्या चर्चांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघता नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची वडेट्टीवार यांनी मागणी केली होती. नाना पटोले यांनीही नवीन जिल्हानिर्मितीचा मुद्दा मांडला. यावर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधानसभेत भाष्य केलंय.

Radhakrishna Vikhe Patil | महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार?

महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मात्र, काही तालुक्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधानसभेत दिली आहे.

जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी उद्‍भवतात. पैसाही भरपूर लागतो. त्यामुळे हा विषय सध्या सरकारच्या धोरणात नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

नवीन तालुक्यांच्या निर्मितीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आगामी तीन महिन्यांत तालुक्यांच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Radhakrishna Vikhe Patil | “त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार”

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली असली, तरी तहसील कार्यालय नाही, अधिकारी व कर्मचारी नाहीत याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. विखे-पाटील यांनी त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचं सांगून सेवेतून बडतर्फ केलं जाईल, असं सभागृहात सांगितलं.

दरम्यान, फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मागील सरकारच्या काळात मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या (New districts in Maharashtra) निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता. मात्र समितीने दिलेल्या अभिप्रायामुळे नव्या जिल्हानिर्मितीचे घोडं अडलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज

PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!