मुंबई | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील खटल्यातील आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Chhagan Bhujbal | भुजबळांच्या अडचणी वाढणार?
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिनही आरोपींनी माफिचा साक्षीदार होण्याकरता अर्ज दाखल केला आहे.
मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी याप्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घ्यावा, ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज सादर केला होता. सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी माफीच्या साक्षीदारासाठी अर्ज सादर केला होता.
या अर्जावर 20 डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले होते. विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
Chhagan Bhujbal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. संबंधित कंपनीने इतर कंपनीला विकासाचे हक्क विकले. पहिल्या कंत्राटदार कंपनीने अपेक्षेपेक्षा प्रचंड नफा कमावला. यात 13 कोटी 50 लाख भुजबळ कुटुंबियांना मिळाल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी पथकाने केला. त्यानंतर ईडीनेही याप्रकरणी कारवाई केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज
PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय