…म्हणून Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार?; धक्कादायक कारणं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहे. गेले काही दिवस या दोघांच्या घटस्फोटाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. शिवाय ‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी देखील ऐश्वर्या रायला आपल्या अधिकृत अकाउंटवरुन अनफाॅलो केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण असल्याच्या चर्चा असल्या तरी ऐश्वर्या आणि अभिषेक कॅमेऱ्यासमोर एकत्रित येत असतात. यावरुन त्यांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक असल्याचं चित्र बोललं जात आहे.(Bollywood News)

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे सॅम बहादूर या चित्रपटाचं स्क्रिनिंग होतं. यावेळी अनेक दिग्गज कलाकरांनी उपस्थिती लावली होती. स्क्रिनिंगसाठी अभिषेक आपला भाचा अगस्त्य नंदासोबत पोहोचला होता. मात्र कायम पतीसोबत दिसणारी ऐश्वर्या मात्र सिनेमाच्या (Aishwarya Rai) स्क्रिनिंगसाठी उपस्थित नव्हती.

दिवाळीत दोघे एकत्रित नव्हते?

दिवाळीवेळी फॅशन डिझानायर मनिष मल्होत्राने (Manish Malhotra) बाॅलिवूडमधील कलाकारांसाठी पार्टीचं नियोजन केलं होतं. तेव्हा सुद्धा ऐश्वर्याने (Aishwarya Rai) तिची मुलगी आराध्यासोबत हजेरी लावली होती. आराध्याच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा अभिषेकबद्दल खूप चर्चा रंगल्या होत्या.

आराध्याच्या वाढदिवसावेळी काय घडलं?

गेल्या महिन्यात आराध्याचा वाढदिवस थाटात साजरा केला होता. यावेळी अभिषेक बच्चन आपल्या मुलीसोबत दिसला नाही. आजोबा अमिताभ बच्चन यांनी देखील नात आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या, त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगलेली पहायला मिळाली होती.

दरम्यान, ऐश्वर्याचा सुद्धा काही दिवसांपूर्वी वाढदिवस पार पडला. ऐश्वर्याचा यंदाचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान तिने आई आणि लेकीसोबत वाढदिवस साजरा केला. तेव्हा बच्चन कुटुंबातील कोणीही ऐश्वर्यासोबत नव्हतं. शिवाय अभिषेक याने देखील सोशल मीडियावर ऐश्वर्या हिला तिच्या एकटीचाच फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना ऊत आला आहे आणि वरील कारणांमुळे ते घटस्फोट घेतील, असं देखील सांगितलं जातंय.

News Title : reason behind Aishwarya rai and Abhishek bachchan divorce

थोडक्यात बातम्या-

Chhagan Bhujbal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा धक्का!

Radhakrishna Vikhe Patil | महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार?, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं

Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज

PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार