मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. त्यावरून मेहबूब शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शेख यांच्याकडून दावा दाखल करण्यात आला होता.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत मेहबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान चित्रा वाघ यांनी बलात्कारी असा उल्लेख केल्याने मेहबूब शेख यांनी बीड न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा स्वीकृत केला आहे.

मेहबूब शेख यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल केलेला दावा शिरूर कासार न्यायालयाने दावा स्वीकृत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय.

दरम्यान, काही लोक जे स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खूप शहाणे असल्याचं समजतात. त्या लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल, आज कोर्टाने त्याची दखल घेतली आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय.

स्वतःला अतिहुशार समजणाऱ्यांना आणि लोकांची बदनामी करत बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निश्चितपणाने कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-