“उद्धव ठाकरे फक्त आता शिल्लक सेनेचे प्रमुख आहेत”

मुंबई | वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि ठाकरे गटाच्या युतीवर आता भाजपने (Bjp) प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील, असा टोला भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाही, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याबाबत माला शंका वाटते असं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी वाचाळवीर नाही तर सरकार (Goverment) आणि पक्षात समन्वय राखण्यासाठी बोलावं लागतं. भाजप राजकारण करत नाही. आम्ही 90टक्के विकास काम करतोस असं बावनकुळे म्हणालेत.

विरोधी पक्षाने भोंगे वाजवणे बंद केलं तर आम्हाला देखील बोलण्याची गरज पडणार नाही. विरोधी पक्षांनी सकारात्मक कामं करावं, असा सल्लाही यावेळी बावनकुळे यांनी दिला आहे.

दरम्यान, कसबा आणि पिंपरीमध्ये उमेदवार द्यायचा की निवडणूक बिनविरोध करायची हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. पण आम्ही दोन्हीकडं उमेदवार देणार आणि आम्हीच विजयी होणार, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-