‘या’ टीप्स फाॅलो केल्या तर हिवाळ्यात होणाऱ्या संक्रमणांपासून होऊ शकतो बचाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या राज्यांत काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. तसेच बंगलाच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रिवादळचा महाराष्ट्रावरही परिणाम होत आहे. त्यामुळं वातावरणात(Weather) सातत्यानं बदल होत आहे. याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊन आपण आजारीही पडू शकतो. परंतु जर काही टीप्स फाॅलो केल्या तर आपण हिवाळ्यात होणाऱ्या संक्रमणांपासून वाचू शकतो.

हिवाळ्यात(Winter) मसाला हर्बल टी(Herbal Tea) दररोज पिला पाहीजे. या चहामध्ये तुम्ही लिंबू किंवा गूळ घालू शकता. या चहामध्ये असलेले गुणधर्म चयापचय वाढवतात. त्यामुळं आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

तुम्ही रोगप्रतिकारशक्ती(Immunity Power) वाढवण्यासाठी हळदीचे दुधही पिऊ शकता. यासाठी एक कप दुधात अर्धा चमचा हळद टाकून उकळून दुध प्यावं लागेल. हळदीचे दूध मेंदूच्या पेशींच्या विकासासाठीही गुणकारी असते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील एक उपाय आहे. खाद्य तेल तोंडाला लावावे आणि थुंकावे. एक चमचा खाद्य तेल घेऊन ते दोन-तीन मिनिटे तोंडात फिरवावे आणि नंतर थुंकावे. यासाठी तुम्ही तीळाचे किंवा खोबरेल तेल(Coconut Oil) वापरू शकता.

च्यवनप्राश खाल्ल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. दिवसातून दोनदा च्यवनप्राश खावे, असं म्हणलं जातं. असं केल्यास कोणत्याही संसर्गापासून संरक्षण होते तसेच रक्तही शुद्ध होते.

नाकातून संसर्ग शरीरात जाऊ नये, यासाठी प्राचीन काळापासून एक प्रथा आहे, त्याला नस्य असं म्हणतात. सकाळी अंघोळीच्या आधी एकतास सरळ झोपावे आणि नाकात तूप किंवा तिळाचे तेल टाकावे. यासाठी खोबरेल तेल वापरले तरी हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या-