महिंद्राची धमाकेदार फिचर्स असलेली इलेक्ट्रिक बाईक बाजारात येण्यासाठी सज्ज

मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel Rate) दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहेत. त्यामुळं ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक दुचाकींचे वेगवेगळे माॅडेल बाजारात आणत आहेत.

अशातच आता महिंद्रा कंपीनीही(Mahindra Company) खास फिचर्स असलेली इलेक्ट्रिक बाईक(Mahindra Electric Bike) मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. ही गाडी महिंद्रा कंपनीच्या मालकीची असलेल्या पिनिनफेरीना कंपनीनं डिझाइन केली आहे. या गाडीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

या गाडीचं नाव Pininfarina Easing PF 40 असं आहे. या गाडीची डिझाइन जराशी जुन्या गाड्यांसारखी आहे. या गाडीचा टाॅप स्पीड 45 किमी. प्रति तास आहे. या गाडीची किंमत 12 लाख रूपये असू शकते. ही दुचाकी लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या गाडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे गाडीला उभ्या रिब्ड टायर दिले जातात. त्यामुळं ते दिसायला एकदम आकर्षित दिसते. तसेच P40 चे गोल हेडलाइट्स आणि हेडलाइट काउल आहेत,ज्यामध्ये LEDs आहे.

आता या गाडीला कितीवेळ चार्ज केलं पाहीजे, याची माहिती जाणून घेऊयात. या दुचाकीला 8 तास चार्ज करता येते. जर फास्ट चार्ज केले तर ही गाडी 4 तासातही चार्ज होऊ शकते. या गाडीच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत.

या इलेक्ट्रिक दुचाकीचे वजन 60 किलो आहे. या गाडीवर 110 किलो वजन ठेवता येऊ शकते. त्यामुळं जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही उत्तम फिचर्स असलेली Pininfarina Easing PF 40 ही गाडी घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-