“डंके की चोट पर स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे”

मुंबई | प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली आहे. डंके की चोट पर मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

संजय राऊत स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाड्याला विरोध करतात. त्यामुळे तुमच्या अकलेची लायकी उघडी पडली आहे. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं सदावर्तेंनी म्हटलंय. तसेच सदावर्तेंनी उदयनराजे भोसलेंवर देखील टीका केली.

उदयनराजेंची जमीन किती? मालमत्ता किती? कर भरतात? योग्य वेळी बाहेर काढणार. उदयनराजे भोसले कर देतात आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे. याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी, असं सदावर्ते म्हणाले आहेत.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या सीमा प्रश्न बैठक घेत असताना संजय राऊत पळ काढून नाशकात काय करत आहेत? छगन भुजबळ आणि संजय राऊत यांची जेलमधून बाहेर येऊन फिफ्टी-फिफ्टी झाली आहे का?, असा सवाल सदावर्तेंनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-