पत्नीचे हातपाय बांधून पतीचं राक्षसी कृत्य; कारण ऐकून हादरून जाल

लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने जेवणात केस सापडल्याने आपल्या पत्नीसोबत राक्षसी कृत्य केलं आहे. जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील आहे.

महिलेचा आरोप आहे, की तिचा पती तिच्यासोबत हे सगळं करत असताना तिच्या सासूने आणि दिराने तिथेच उभा राहून हे सगळं फक्त बघत राहाण्याचं काम केलं.

इतकंच नाही तर ते महिलेच्या पतीला आणखी भडकवत राहिले. महिलेचं म्हणणं आहे, की तिने फोन करून माहेरकडच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. मात्र माहेरकडचे लोक घरी पोहोचताच पतीने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More