“प्रत्येकवेळी नेहरू- गांधी घराण्यावर खापर फोडून काय होणार?”

मुंबई | अरुणाचल प्रदेशमधील तवांग सीमेवर 9 डिसेंबरच्या रात्री चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Samana) अग्रलेखातून मोदी सरकारवर (Modi Goverment) सडकून टीका करण्यात आली आहे.

‘मागे जे झाले ते झाले, पण आता चीनच्या सीमेवर जे घडले, जे घडत आहे त्याचे काय? ‘मोदीनॉमिक्स’प्रमाणेच मोदी सरकारच्या ‘यशस्वी’ परराष्ट्र धोरणाचे ढोल वाजवता ना, मग कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग आणि गलवान–तवांगमधील चिनी घुसखोरी याची जबाबदारीही घ्या, असं शिवसेनेनं म्हटलंय.

आधीच्या सरकारांकडे बोट दाखवून पळ काढू नका. तुमची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल, असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात जसा हल्ला चिन्यांनी हिंदुस्थानी सैन्यावर केला होता तसाच हल्ला तवांगमध्येही करण्याची चिनी लष्कराची योजना होती. सुदैवाने हिंदुस्थानी सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर देत चिन्यांना हुसकावून लावले. या कामगिरीबद्दल संरक्षणमंत्र्यांपासून सरकारमधील सगळेच आता त्यांचे अभिनंदन करीत आहेत. ते व्हायलाच हवं, पण सरकार म्हणून तुमच्या ज्या उणिवा, चुका चिन्यांच्या कुरापतींमधून उघड होत आहेत त्याचं कोणतं उत्तर तुमच्याकडे आहे?, असा सवाल शिवसेनेनं केलाय.

काहीही झालं की आधीच्या राज्यकर्त्यांकडे बोट दाखवायचं. कश्मीरचा प्रश्न असो की चीनसोबतचा तंटा, पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्षाच्या नावाने खडे फोडायचे. आताही तेच सुरू आहे. प्रत्येक वेळी नेहरू-गांधी घराणे आणि काँग्रेसवर खापर फोडून काय होणार? असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून उपस्थितीत करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More