ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन आता व्होडकाचा नवीन ब्रॅंड लाॅंच करणार

मुंबई | काही दिवसांपूर्वी बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खानचा(Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानं चर्चेत आला होता. या प्रकरणी त्यानं काही महिने जेलची हवाही खाल्ली आहे. या प्रकरणी आर्यनला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केलं गेलं होतं.

परंतु आता आर्यन एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे. आर्यन बालिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. परंतु आर्यन कलाकार म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून चंदेरी दुनियेत पाऊल टाकणार आहे. त्यामुळं चाहत्यांचा त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणेज आर्यन उद्योगविश्वातही पदार्पण करणार आहे. तो व्होडकाचा वेगळा ब्रॅंड सुरू करणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोलही केलं जात आहे.

आर्यन एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे की, अनेक दिवसांपासून व्होडकाचा नवीन ब्रॅंड सुरू करण्याची माझी इच्छा होती. परंतु आता हे स्वप्न सत्यात येत असल्यानं मला आनंद होत आहे.

आर्यन पुढं असंही म्हणाला की, जगातील दुसऱ्या मोठ्या कंपनीला मी पार्टनर म्हणून घेतलं आहे. रिसर्चनंतर लवकरच तो प्रोडक्ट ग्राहकांसमोर येईल, अशी माहितीही आर्यननं दिली आहे.

दरम्यान, आर्यनचं नाव ड्रग्ज प्रकरणात आल्यापासून त्याला जास्त ट्रोल केलं गेलं. त्यातच त्यानं व्होडकाचा नवीन ब्रॅंड सुरू करणार असल्याची माहिती समोर येताच त्याला पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-