‘या’ ईलेक्ट्रिक स्कूटर देतात 320 किमी पर्यंत रेंज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| सध्या पेट्राल-डिझेलच्या (Petrol-Diesel)दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण ईलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या इलेक्ट्रिक गाड्या बनविणाऱ्या कंपन्याही ग्राहकांची मागणी लक्षात घेत, त्यानुसार नवनवीन माॅडेल बाजारात आणत आहेत. त्यामुळं आता एकापेक्षा एक फिचर्स असणाऱ्या ईलेक्ट्रिक गाड्या बाजारात उपलब्ध आहेत.

ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) घेताना गाडीच्या रेंजबद्दल जास्त विचार करत असतात. आता अशा ग्राहकांसाठी ही महत्वाची माहिती आहे. कारण आम्ही तुम्हाला रेंज जास्त देणाऱ्या दुचाकींची माहिती देणार आहे.

सर्वप्रथम ग्रॅव्हटन क्वांटा या बाईक आणि स्कूटरचे मिश्रण असलेल्या दुचाकीबद्दल जाणून घेऊयात. या गाडीमध्ये 3kwh बॅटरी पॅक आहे. जर गाडीतील चार्ज फुल असेल तर तुम्ही 150 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता. खास म्हणजे या गाडीमध्ये दोन बॅटरी ठेवण्याची सुविधा आहे. दोन्ही बॅटरीसह तुम्ही 320 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता.

ओला एस1 प्रो(Ola S1 Pro) ही सुद्धा खास फिचर्स असलेली स्कूटर आहे. या गाडीमध्ये फुल चार्ज असेल तर तुम्ही 181 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता. ओलामधील ही लोकप्रिय स्कूटर आहे.

सिंपल वन ही स्कूटरही फुल चार्ज केल्यावर जास्त रेंज देते. पूर्ण चार्ज असल्यास या गाडीवर तुम्ही 236 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता. त्यामुळं जर तुम्हाला जास्त रेंज देणारी दुचाकी हवी असेल तर तुम्ही ही स्कूटर खरेदी करू शकता.

महत्वाच्या बातम्या-