सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सूचक इशारा, म्हणाल्या…

मुंबई | शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सूचक इशारा दिला आहे.

देवेंद्रजींना विसर पडला असेल तर मी सांगू इच्छिते की ते राज्याचे गृहमंत्री आहेत एका पक्षाचे नाहीत, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी सुनावलं आहे.

महाराष्ट्राच्या भावना समजून घ्या. किमान सभागृहात निंदाजनक ठराव घ्या. तसेच देवेंद्रजींनी लोकभावना समजून घ्यावी. मात्र ते भाजपच्या नेत्यांना पाठिशी घालत असतील तर देवेंद्रजी आपल्याला आणि भाजपला हे वाचाळवीर बुडवल्याशिवाय राहणार नाही, असाही इशाराही अंधारे यांनी दिला.

पंतप्रधान मोदींजींना रावण म्हटल्यानंतर अत्यंत तत्परतेने देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र महापुरुषांचा सातत्याने अवमान होत असताना ते सोयीस्कर मौन बाळगून आहे, असं अंधारे म्हणाल्यात.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्या विधानांवर ते गप्प आहे. भाजपकडून आणि टीम देवेंद्र यांच्याकडून महापुरुषांचा अवमान करण्याचा सुनियोजित कट रचला जात असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More