वाढदिवसादिवशी पवारांचा मोदींना खोचक टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. रविवारी त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. उद्घाटन प्रसंगी बोलताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला सोमवारी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील उपस्थितांना पवारांनी संबोधित केलं. यावेळी पवार म्हणाले, काल मोदींचं भाषण झालं. या भाषणाद्वारे मोदींनी विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्या कामासाठी किंवा निवडणुकीच्या निमित्तान गेले असते आणि त्यांनी जर पक्षाची भूमिका मांडली असती, विरोधकांवर टीका केलीअसती तरी त्यांचा तो अधिकार आहे.

परंतु रस्त्याचं, रेल्वेचं किंवा हाॅस्पिटलच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सरकारी आहेत. आणि अशा सरकारी कामांचं उद्घटान जेव्हा देशाचा पंतप्रधान करत असतो अशावेळी सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं कितपत शाहणपणाच आहे? असा सवाल उपस्थित करत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही पवार म्हणाले.

मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांची कार्यक्रम पाहिले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक पंतप्रधानांना ऐकले आहे. पंडित नेहरूंनी निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यावरही कधी विरोधकांवर टीका केली नाही. त्यांनी नेहमी आपली भूमिका मांडली,असंही पवार म्हणाले.

आपेल विरोधक, विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेते यापण लोकशाहीच्या संस्था आहेत. त्यांचा सन्मान ठेवला पाहीजे. हे आपल्या देशाच्या जवळपास सर्वच पंतप्रधानांनी पाळलं. परंतु आज ते पाळलं जात नाही, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांचा पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तसेच सुप्रिया सुळेंनीही, प्रिय बाबा तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्त्रोत आहात म्हणत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-