शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; घरबसल्या लाखो कमवता येणार

मुंबई | शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना घरी बसूनच पैसे कमावता येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचे नाव ‘सोलर पंप योजना’ असे आहे.

सरकार सौरऊर्जेच्या वापरासाठी मोठी पावले उचलत असून सरकार अनेक योजना राबवत आहे.अनेकांना याबाबत माहिती नसते. माहितीच्या अभावामुळे लोक या योजनांचा लाभ घेता येत नाही.

सौरपंप बसवून शेतकरी सिंचन करून पैसेही कमवू शकतात. यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. त्यामुळे वीज आणि डिझेलसह सिंचनाच्या खर्चातही मोठा दिलासा मिळेल.

या योजनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही http://pmkusum.mnre.gov.in ला भेट देऊ शकता. तसेच 1800-180-3333  या टोल फ्री क्रमांकावर जाऊन तुम्ही इतर माहिती मिळवू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्ही जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत वीज निर्माण करू शकता. विभाग 3 रुपये 7 पैसे दराने उत्पादित वीज खरेदी करेल.

शेतकऱ्यांना वार्षिक 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं. त्याचप्रमाणे वीज विक्रीवर दरवर्षी एकरी 60 हजार ते 1 लाख रुपये मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या-