शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय!
मुंबई | आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने (Shinde Goverment) अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा सुरु करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
या योजनेला जलयुक्त शिवार अभियान 2.0, असं नाव देण्यात आलेलं आहे. राज्यातील गावे पुन्हा समृद्ध करण्यसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं.
ग्रामीण भागासाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढ, पुण्यातील आंबेगावमध्ये शिवसृष्टी उभारणीला निधी देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेत.
दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार 2014 साली सत्तेवर आल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आलं
या अभियानातील गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे अभियान गुंडाळण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार अभियानाला संजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यात सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हे अभियान गाजावाजा करून 2014 ला राबवण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.