सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का!
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्हं कोणाचं याबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून 7 न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.
ठाकरे गटाची ही मागणी न्यायालयाने नाकारल्याने ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. पाच न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापीठासमोर पुढील सुनावणी 10 जानेवारीला पार पडणार आहे.
महाराष्ट्र सत्ता संगर्ष उद्धव विरुद्ध शिंदे गटातील अपात्रता प्रकरण न्यायलयाने मागणी केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सुनावणी पुढे ढकलली आहे.
दरम्यान याची पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे. हे प्रकरण 5 ऐवजी 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याची उद्धव ठाकरे गटाने मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.