‘या’ कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; वेतनासंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | शिंदे सरकारने (Shinde Goverment) मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना 60 टक्के अनुदान मिळणार आहे जे की आतापर्यंत 40 टक्के होते. यामुळे अशा शिक्षकांचे पगार 25000 वरून थेट 40 हजारावर जाणार आहेत.

2012 मध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची तरतूद तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र त्यावेळी किती अनुदान मिळेल याबाबत निर्णय झाला नव्हता.

मुख्यमंत्रीपदावर पिठासीन झाल्यानंतर देवेंद्र सरकारने 20 टक्के अनुदान विनाअनुदानित शाळांना देण्यासाठी मान्यतां दिली. यानंतर जवळपास चार वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये या अनुदानात वाढ करण्यात आली आणि अनुदान 40% एवढे झालं. आता पुन्हा एकदा काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला.

आता या अनुदानामध्ये 20 टक्के वाढ झाली असून आता विनाअनुदानित शाळांना 60 टक्के एवढ अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी 1100 कोटी रूपयांचं अनुदान देण्यात आलं आहे.

दरम्यान, जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे पगार 60 टक्क्यांनी वाढणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More