फक्त ‘या’ चुका करणं टाळा, तुमची बाईकही देईल पुन्हा नव्यासारखे मायलेज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel) किंमती सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळं अनेकजण गाडी खरेदी करत असताना सर्वोत्तम मायलेज(Vehicle Mileage) देणाऱ्या गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

काही वेळा असंही होतं की, गाड्या अपेक्षेपेक्षा कमी मायलेज देतात. परंतु असंही असू शकतं की, तुमच्या काही चुकांमुळं गाडी कमी मायलेज देत आहे. त्यामुळं कोणत्या चुकांमुळं गाडी कमी मायलेज देऊ शकते, हे आपण जाऊण घेऊयात.

अनेकजण गाडी अधिक स्पीडनं चालवतात. त्यामुळंही गाडीचं मायलेज कमी होऊ शकतं. तुम्ही जर 65-70 पेक्षा जास्त स्पीड(Vehicle Speed) पकडली, तर स्पीड जास्त ठेवण्यासाठी पेट्रोल जास्त खेचलं जातं. म्हणजेच जर तुम्ही गाडी सामान्य स्पीडनं चालवली तर गाडी चांगलं मायलेज देते.

गाडी वेळेत सर्व्हिसिंग करून घेणंही तितकचं गरजेचं आहे. जर वेळेवर सर्व्हिसिंग(Vehicle Servicing) झालं नाही तर मायलेजसह गाडीच्या इतर पार्टवरही परिणाम होतो. त्यामुळं चांगल्या मायलेजसाठी गाडी वेळेवर सर्व्हिंसिंग करून घेतली पाहीजे.

जर गाडीतील इंजित ऑईल कमी झाले असेल आणि तरीही तुम्ही गाडी चालवत राहीला, तर त्याचा परिणाम इंजिनवर होत असतो. अशा परिस्थीत इंजिन जप्तही होऊ शकतं. तसेच मायलेजवरही परिणाम होतो.

आपल्या गाडीच्या टायरमधील हवा सातत्यानं तपासत राहिलं पाहीजे, कारण टायरचा दाब आणि मायलेजचा थेट संबंध असतो. त्यामुळं जर चाकात हवा व्यवस्थित असेल तर तुम्हाला चांगले मायलेज मिळेल.

महत्वाच्या बातम्या-