केजरीवालांचा भाजपला जोर का झटका; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. त्यांनी भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपचा सुपडा साफ केलाय.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत आपचा महापौर बसणार असल्याचं निश्चित झालं आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दिल्ली पालिका निवडणुकीत 250 जागांसाठी लढत झाली. त्यामध्ये ‘आप’ला 134 जागा, भाजपला 104, काँग्रेस 9 आणि अपक्ष 3 असे उमेदवार निवडून आले. 134 जागा जिंकत ‘आप’ने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर ‘आप’चे खासदार राघव चड्डा यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या पक्षाला हरवले, असं राघव चड्डा यांनी म्हटलं आहे.

मागील 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत होती.

मतमोजणी सुरु होताच भाजप आणि आपमध्येच जोरदार रस्सीखेच सुरु झाली. सकाळच्या सत्रातच आपने भाजप उमेदवारांच्या तुलनेत जोरदार मुसंडी मारली.

दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने 7 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 15 पेक्षा जास्त केंद्रीय मंत्री प्रचारात उतरवले होते. तर अरविंद केजरीवाल यांनीदेखील जोरदार प्रचार केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-