महाराष्ट्र हादरला! 6 वर्षांच्या लेकीला बापानेच संपवलं नंतर…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Latur Crime | लातूरमध्ये (Latur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमध्ये सहा वर्षाच्या मुलीला तिच्या 35 वर्षे वयाच्या वडिलांनी  फास देत तिला संपवलं आहे. त्यानंतर स्वत: गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे लातूर (Latur Crime) शहर हादरलं आहे. बापानेच आपल्या मुलीचा जीव घेतला असून स्वत:ला देखील संपवलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आधी मुलीला गळफास दिला अन्…

सहा वर्षाच्या मुलीला बेडशीटने गळा आवळून बापाने मारलं आहे. त्यानंतर त्याच बेडशिटने बापाने स्वत: गळफास घेतला आहे. यामुळे लातूरमध्ये (Latur Crime) मोठी खळबळ उडाली आहे. लातूरच्या मार्केट यार्डमध्ये असलेल्या मोतीनगर भागामध्ये ही घटना घडली आहे.

लातूरच्या (Latur Crime) दक्षिण भागामध्ये भुतडा कुंटुंबीय राहतात. त्यांचे याच भागामध्ये कोरे गार्डनसमोर ईडली गृह आहे. अभय लखन भुतडा असं वडिलांचं नाव (वय 35) असून मुलीला ईडली देतो आणि शाळेत नेऊन सोडतो असं कारण त्यानं सांगितलं आहे. त्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलीला घरी नेलं आणि तिला गळफास दिला तर त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

काय होतं नेमकं कारण?

अभय भुतडाने आपल्या पोटच्या मुलीच्या गळ्याला गळफास का दिला? स्वत: देखील गळफास का घेतला? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अभय भुतडाला कसला राग होता का? त्यानं असं पाऊल का उचललं असेल? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

भुतडा कुटुंबाची मोठी इमारत आहे. काही अर्थिक कराणावरून तर हा प्रकार घडला नाही ना? अशा चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल. यामागे नेमकं कारण काय आहे. हे देखील लवकरच उघडकीस येईल, अशी माहिती समोर आली आहे.

मुलीला गळफास देताना आणि स्वत: गळफास घेताना त्याची पत्नी त्याठिकाणी उपस्थित नव्हती. यावेळी ती तिच्याच माहेरी गेली होती. यावेळी अभयने हे पाऊल उचललं आहे.

News Title – Latur Crime News Update Father And Doughter

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा!

लाखाचा खेळाडू करोडोंवर भारी; रिंकू सिंहने मिचेल स्टार्कला दाखवलं आभाळ, पाहा व्हिडीओ

सस्पेन्स वाढला! वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण, म्हणाले…

RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; IPL आधी फ्रेंचायसीने घेतला महत्त्वाचा निर्णय

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!