LIC ची जबरदस्त योजना; रोज 60 रुपयांची बचत देईल लाखोंचा परतावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LIC Scheme | आजकाल कोणत्या क्षणी आपल्याला आर्थिक गरज भासेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण नेहमीच कमाईच्या पैशातून थोडे थोडे पैसे बचत करत असतो. हा बचतीचा पैसा कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी बराच विचार करावा लागतो. कारण, केलेली गुंतवणूक (LIC Scheme) फायदा देईल की नाही, याची चिंता आपल्याला लागलेली असते.

आता कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी, याची निवड करणंही फार अवघड जातं. त्यातच महिलांसाठी गुंतवणूक करणाऱ्या अनेक स्कीम असतात. मात्र, कशावर विश्वास ठेवावा हे लवकर समजत नाही. आता तुमच्यासाठी अशीच एक स्कीम सांगणार आहोत, जी खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने विशेषतः महिलांसाठी ही योजना आणली आहे. ही एक एन्डाउमेंट पॉलिसी आहे, जी जीवन संरक्षणासह बचतीचा लाभ देते. यामुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. मॅच्युरिटीनंतर याचा चांगला परतावा देखील मिळतो.

LIC ची महिलांसाठी जबरदस्त स्कीम

या योजनेसाठी 8 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते. पॉलिसीची मुदत 10 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत असते. तर, याच्या मॅच्युरिटीचे (LIC Scheme) कमाल वय 70 वर्षे आहे. यामध्ये महिलांना अनेक सुविधा देखील दिल्या जातात.

विम्याची रक्कम किमान 75000 रुपये असून मॅच्युरिटी दरम्यान गुंतवणूकदारांना बेसिक सम ॲश्युअर्ड तसेच लॉयल्टी एडिशनचा लाभ मिळतो. तुम्ही 2 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर ते सरेंडर देखील करू शकता. आवश्यकतेनुसार कर्ज लाभ देखील उपलब्ध आहेत.

8 लाख रुपयांचा परतावा मिळणार

तुम्ही तुमच्या सोयीनुसार (LIC Scheme) मासिक, वार्षिक, अर्धवार्षिक आणि अर्धवार्षिक प्रीमियम भरू शकता.या योजनेत मासिक प्रीमियम किमान 5000 रुपये आहे. वयाच्या 20 व्या वर्षी महिला 20 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी करू शकतात आणि 8 लाख रुपयांपर्यंतच्या निधीसाठी दररोज 58 रुपये वाचवून हा मोठा फंड बनवू शकतात.

News Title- LIC Scheme for Women

महत्त्वाच्या बातम्या –

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!

गर्भपाताला घटनात्मक अधिकार! ‘या’ देशाचं मोठं पाऊल; असं करणारा ठरला जगातील पहिला देश

टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरी पोलिसांचा छापा; पैशांनी भरलेली बॅगेसह ‘इतके’ कोटी जप्त

वाद चिघळला! कंगनाचे गंभीर आरोप अन् इमरान हाश्मीचे चोख प्रत्युत्तर

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा