टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरी पोलिसांचा छापा; पैशांनी भरलेली बॅगेसह ‘इतके’ कोटी जप्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुन्हा एकदा पोलिसांचा संशय त्यांच्याप्रती बळावला असून कारवाई करण्यात आली आहे. आरोठे यांची पुन्हा एकदा पोलिसांनी चौकशी केली. यावेळी तुषार आरोठे यांच्या घरातून रक्कम वसुलीच्या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. वडोदरा येथील पटपरगंज भागातील तुषार आरोठेंच्या घरातून पोलिसांनी एक कोटी रुपये जप्त केले आहेत.

हा पैसा कसा आला, कुठून आला, त्याचा स्रोत काय, अशा प्रश्नांची अचूक उत्तरे माजी भारतीय प्रशिक्षकाकडून मिळाली नाहीत, ज्यामुळे पोलिसांचे समाधान होऊ शकेल. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. रणजी सामने खेळलेल्या तुषार आरोठे यांनी 2018 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ 2017 आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

पैशांनी भरलेली बॅग सापडली

वडोदरा पोलिसांनी या प्रकरणी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, आरोठे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यांनी एवढा पैसा कुठून आणला याचे स्पष्ट उत्तर दिले नाही. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी घरावर छापा टाकला आणि राखाडी रंगाच्या पिशवीतील रक्कम जप्त केली, ज्यात एकूण रक्कम 1.01 कोटी रुपये होती.

तुषार आरोठेंची पोलिसांकडून चौकशी होण्याची ही पहिलीच घटना नाही. भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि माजी रणजी खेळाडू असलेल्या आरोठे यांना यापूर्वी आयपीएलमध्ये फिक्सिंग करताना पोलिसांनी पकडले आहे. IPL 2019 दरम्यान जेव्हा गुजरात पोलिसांनी एका कॅफेमध्ये छापा टाकून 19 जणांना अटक केली, तेव्हा आरोठे हे त्यापैकी एक होते. त्यानंतर आरोठे यांचा फोन आणि कारही जप्त करण्यात आली होती.

 

Team India चे माजी कोच आरोठे

पोलिसांनी आरोठे यांच्या मोबाईलची झडती घेतली असता त्यांना त्यात कोणतेही बेटिंग संंबंधित ॲप आढळले नाही, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी छापा टाकलेल्या कॅफेमध्ये तुषार आरोठे यांचाही सहभाग होता. ते म्हणाले होते की, जर काही लोक माझ्या कॅफेमध्ये आले आणि त्यांनी मोबाईल ॲपवर बेट लावले तर मला कसे कळणार? मात्र, कॅफेमध्ये जे काही चालले आहे, त्याची माहिती आरोठे यांना होती, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, तुषार आरोठे हे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. 2018 मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता, जो बीसीसीआयनेही स्वीकारला होता. भारतीय महिला क्रिकेट संघ 2017 ICC विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा संघाचे प्रशिक्षक तुषार आरोठे होते.

News Title- Police has raided the house of former Indian women’s cricket team coach Tushar Arothe and seized Rs 1 crore
महत्त्वाच्या बातम्या –

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”