“…म्हणून गडकरींचा पत्ता कट करण्याचा डाव”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. भाजपाने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असू या यादीवरून सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच पहिल्या यादीच नितीन गडकरींचं (Nitin Gadkari) नाव नसल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

यावरूनच ठाकरे गटाकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. आजच्या सामना अग्रलेखातून गडकरींना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

“मंत्रिमंडळात व भाजपमध्ये मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी. अशा गडकरींचे आव्हान म्हणा की भीती, ही मोदी-शहांच्या व्यापार मंडळास वाटणारच. त्याच भीतीमुळे 2024 च्या निवडणुकीतून नितीन गडकरींना डावलायचे असे ठरवलेले दिसते”, असा दावा करण्यात आला आहे.

“…तर मोदी-शहांचा उदय झालाच नसता”

2024 साली पक्षात कोणाचेही आव्हान असू नये व गडकरी हे आव्हान ठरू शकतात. भाजपचा खेळ 230-235 वर आटोपला तर भाजपमध्येच बंड होईल आणि मोदी-शहांना वगळता भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर नितीन गडकरी यांच्या नावास सर्वमान्यता मिळेल, या एकाच भीतीने गडकरी (Nitin Gadkari) यांचा पत्ता आताच कट करण्याचा डाव दिसतो आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

आगामी निवडणुकीनंतरचे दिल्लीतील राजकीय चित्र अस्थिर असेल व त्या अस्थिरतेच्या काळात सर्वच पक्षांना मान्य ठरतील असे गडकरी दिल्लीत नकोत हा साधा हिशेब दिसतो. गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळू नये म्हणून तेव्हा भाजपमध्ये गलिच्छ राजकारण झाले, असं गडकरींनी म्हटलंय.

गडकरींऐवजी फडणवीस नागपुरातून लढणार?

गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष झाले असते तर राष्ट्रीय राजकारणात मोदी-शहांचा उदय झाला नसता. गडकरींच्या जागी राजनाथ सिंह भाजपचे अध्यक्ष झाले व त्यांनी मोदी हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असे जाहीर केले. गडकरी (Nitin Gadkari) यांना उमेदवारी नाकारली तर नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार बनवले जाईल व फडणवीसही मोठ्या हौसेने नागपुरातील नवरदेव म्हणून घोड्यावर बसतील, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

News Title-  Uddhav Thackeray faction slams Narendra Modi over Nitin Gadkari candidacy

महत्त्वाच्या बातम्या –

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”