…त्यांना असं पाडा की त्यांच्या 5 पिढ्या पुन्हा उठल्या नाही पाहिजेत!, मनोज जरांगे पाटील नेमकं कुणाबद्दल बोलले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज अंबड येथे मतदानाचा अधिकार बजावला. काही दिवसांआधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज ते रूग्णवाहिकेनं मतदानासाठी आले होतं. त्यांनी मतदान केलं. मराठा आरक्षणाला विरोध करत असलेल्यांना पाडा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. (Manoj Jarange Patil)

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“मी सांगितलं होतं की कोणालाही मतदान करा. सगेसोयरे आणि मराठा कुणबी एकच आहे या एकाच बाजूने विचार करणाऱ्यांना समाजाने सहकार्य करावे. मात्र या सर्व बाबतीत विरोध असलेल्यांना पाडा. जरी आपण उमेदवार दिला नाही. पाठिंबा दिला नाही पण पाडण्यात आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे व्हा. 6 जूनच्या आत जर आरक्षण दिलं नाही तर आरक्षण देणारे बनू. विधानसभेच्या मैदानात मीसुद्धा असेल. कारण मराठा, धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“बारा बलुतेदार, दलितांचा प्रश्न आहे. महायुती आणि महाविकास आघाडी हे एकच असल्याचं माझं म्हणणं आहे. या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. दोघांनी लेकरांचं वाटोळं केलंय,” असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

पाच पिढ्या निवडणुकीला उभे नाही राहिले पाहिजेत

मनोज जरांगे म्हणाले की, “आपला उमेदवार नसल्याने, तुम्ही कोणालाही मतदान करा. जो मराठा आरक्षण आणि सगेसोयरेला विरोध करत आहेत त्यांना पाडा. त्यांना असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या पुन्हा उठल्या नाही पाहिजेत. मराठ्यांनी एकजुटता दाखवा. 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही. पण मला तिकडे न्यायचा प्रयत्न करत असल्याने माझा देखील नाईलाज असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत.”

गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उपोषण करताना दिसत आहेत. शिंदे सरकारने मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय़ घेतला. त्याची अंमलबजावणी देखील केली. मात्र मराठा समाज आणि मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सगेसोयरेची अंमलबजावणी करण्याबाबत मुद्दा लावून धरला आहे. येत्या 4 जूनला याचेच पडसाद कोणत्या मतदारसंघात किती प्रमाणात पाहायला मिळणार आहे हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Manoj Jarange Patil Big Appeal After Vote At Ambad

महत्त्वाच्या बातम्या

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यूपीएससी अंतर्गत तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

‘या’ बड्या नेत्याचा शिंदेसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

…त्या वक्तव्यावरून अजितदादांना दिलासा तर शरद पवार गटाला झटका

बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा