Manoj Jarange Patil | 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषण, मनोज जरांगे पाटलांनी सांगितला सगळा प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केल्या आंदोलनाला आता नवं वळण मिळालं आहे. 24 डिसेंबरपर्यंत जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती, मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. याच कारणामुळे बीडमधील सभेत बोलताना जरांगे पाटलांनी थेट मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan Mumbai) उपोषण करण्याची घोषणा केली आहे. 20 जानेवारीपासून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाबाबतचा सगळा प्लॅन त्यांनी सांगितला आहे.

मुंबईला पायी जाणार मनोज जरांगे पाटील-

मुंबईचे आझाद मैदान आतापर्यंत अनेक ऐतिहासिक घटना आणि घडामोडींचं साक्षीदार आहे, त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनासाठी या मैदानाची निवड केली असावी. 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील याच मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र मुंबईला जाताना मनोज जरांगे पाटील स्वतः पायी चालत जाणार आहेत. त्यांनी स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे.

“मी आंतरवली सराटीमधून पायी मुंबईला (Mumbai Maratha Morcha) जाण्यासाठी निघणार आहे. मुंबईला जाताना वाटेत लोक माझ्यासोबत येतील, मुंबईकडे कूच करतील. मुंबईला जाताना कुणीही हिंसा करायची नाही. मराठ्यांना कुठलाही डाग लागू द्यायचा नाहीये. कुणी जाळपोळ, तोडफोड अजिबात करायची नाही. शांततेत जायचं आणि शांततेत यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही, हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. एवढंच नव्हे तर मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे यायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये काय काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये (Beed Maratha Sabha) जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे जरांगे पाटलांच्या बीडमधील सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. बीडमध्ये जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. जरांगे पाटलांचं मोठ्या जल्लोषात आणि घोषणांच्या जयघोषात स्वागत करण्यात आलं तसेच त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

महत्त्वाची बातमी- | मनस्ताप नको असेल तर आत्ताच वाचा!, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठा बदल

या सभेत बोलताना जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “आता देव जरी आडवा आला, तरी मराठ्यांना OBCतूनच आरक्षण घेणार. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका, आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. आपल्या पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा, असं आवाहन त्यांनी (Manoj Jarange Patil) मराठा महिला-भगिनींना केलं.

दरम्यान, सरकारने 10-12 दिवस मिळत आहेत ते बघावेत. सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी. देशातील सगळ्या मोठ्या जातींचा घात करण्याचा घाट तुम्ही घातला आहे पण आता मराठा समाज जागा झाला आहे. आमच्या नादाला लागाल तर तुमचं राजकीय अस्तित्व संपवून टाकू, अशा शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मी मॅनेज होत नाही, हा या सरकारचा खरा प्रॉब्लेम असल्याचं देखील त्यांनी(Manoj Jarange Patil) यावेळी केलेल्या भाषणात म्हटलं आहे.

News Title- manoj jarange patil mumbai Azad maidan morcha announcement

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Maratha Reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा!, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करणार?

Weather Update | राज्यात थंडीचा मुक्काम आणखी वाढणार!, महत्त्वाची माहिती आली समोर