Maratha Reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, आरक्षणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान, सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या आहेत. याशिवाय मराठा आरक्षणाच्या पुढच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तारिख दिली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मराठा आरक्षणावर गेल्या काही महिन्यांपासून वाद विवाद चालू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला येत्या 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळणार?

मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटीशन सुनावणीसाठी ठेवली आहे.

“याचा अर्थ असा होतो की, क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारली नसून, ती स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यावर सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल”, असं विनोद पाटील म्हणाले आहेत.

कधी होणार पुढची सुनावणी?

दरम्यान, येत्या 24 जानेवारीला यासंदर्भातली सुनावणी ठेवण्यात आली आहे.या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश संजय कौल, संजीव खन्ना आणि बीआर गवई यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे, मात्र दुसरीकडे जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपत आला आहे त्यामुळे ते नेमका काय निर्णय घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

News Title : Maratha reservation big relief to Maratha community

महत्त्वाच्या बातम्या-

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा!, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करणार?

Weather Update | राज्यात थंडीचा मुक्काम आणखी वाढणार!, महत्त्वाची माहिती आली समोर

Pune-PCMC News | मनस्ताप नको असेल तर आत्ताच वाचा!, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठा बदल

Aishwarya Rai | ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या झाली भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा