Elvish Yadav मित्राला मारहाण होत असताना पळून गेला?, वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी नेमकं काय घडलं???

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Elvish Yadav |बिग बॉस फेम” एल्विश यादव अलीकडेच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मूला पोहोचला आहे. दरम्यान, त्याच्यावर आणि त्याचा जवळचा मित्र राघव शर्मा यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. घडलेल्या प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एल्विश यादव आणि त्याच्या मित्रावर जमावाने हल्ला केल्याचा दावा केला जात होता. याप्रकरणी नेमकं काय घडलं याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.

नेमकं काय घडलं?

“बिग बाॅस ओटीटी 2” विजेता एल्विश यादव काही दिवसांपूर्वीपासून चर्चेत आला होता. आधी तो बिग बॉस ओटीटी जिंकल्यामुळे चर्चेत होता, नंतर त्याच्यावर सापांचं विष नशा करण्यासाठी विकत असल्याचा आरोप भाजप खासदार मनेका गांधी यांनी केला होता. आता मात्र एल्विश नव्याच कारनाम्यामुळे चर्चेत आहे.  एल्विशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या मित्रांसोबत एल्विश जम्मू येथील वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला होता. त्यावेळेस तिथे एल्विशचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की स्थानिकांनी त्याला मारहाण केल्याचा आणि त्याने तेथून पळ काढल्याचा दावा करण्यात येत होता.

एल्विशसोबत नेमकं काय घडलं?

एका व्यक्तीने एल्विश आणि राघवसोबत फोटो काढण्याची मागणी केली होती, मात्र, दोघांनीही त्याला नकार दिला. याच कारणामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि हा वाद चांगलाच वाढत गेला. हा वाद एवढा वाढला की रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीने राघवची कॉलर पकडली नंतर त्याने राघवला ढकलून सुद्धा दिलं.

एल्विश पळून गेल्याचा आरोप

दरम्यान, तिथे असलेल्या एका व्यक्तीने राघव शर्माची कॉलर पकडल्यामुळे, हे तू काय करतोस?, तू कोण आहेस? असा प्रश्न विचारताना पहायला मिळतोय. मात्र, हा सारा प्रकार सुरु असताना एल्विश यादव अगोदरच आधीच तिथून निघून गेल्याचा दावा केला जातोय. मात्र एल्विश यादवने हा दावा साफ फेटाळून लावला आहे.

काय म्हणाला एल्विश यादव?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर एल्विश यादवने मौन सोडलं आहे. तो म्हणाला की, “जोपर्यंत अशा बातम्या देणारे लोक जिवंत आहेत, तोपर्यंत अशा अफवा सुरुच राहतील. ज्या दिवशी माझ्यावर हात उचलणाऱ्याचा जन्म होईल, त्या दिवशी कलियुग संपेल.”, असं एल्विश यादवने म्हटलं आहे.

News Title : did elvish yadav get beaten at jammu

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Maratha Reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा!, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करणार?

Weather Update | राज्यात थंडीचा मुक्काम आणखी वाढणार!, महत्त्वाची माहिती आली समोर

Pune-PCMC News | मनस्ताप नको असेल तर आत्ताच वाचा!, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठा बदल