Maruti Suzuki, TATA की Hyundai?, 2023 मध्ये भारतीयांनी Googleवर कोणत्या कंपनीच्या गाड्या सर्वात जास्त शोधल्या?

Maruti Suzuki, TATA, Hyundai | गाड्यांची क्रेझ नाही, अशी लोकं फारच कमी आहेत. दरवर्षी नवनवीन गाड्या येतात आणि लोक या गाड्यांबद्दल माहिती शोधत असतात. अनेकांना गाड्या घ्यायच्या असतात तेव्हाही गुगलचा सहारा घेतला जातो आणि आपल्या आवडत्या गाडीची माहिती शोधली जाते. यामध्ये गाडीच्या किंमतीपासून ते तिच्या फीचर्सपर्यंत अनेक गोष्टी सर्च केल्या जातात. आता वर्षाची शेवटी साल 2023 मध्ये लोकांनी गुगलवर कुठल्या कंपनीच्या गाड्या जास्त शोधल्या याची माहिती समोर आली आहे.

जगभरात कुठल्या कंपनीच्या गाड्यांची हवा?-

यंदाच्या वर्षी Toyota कंपनीच्या गाड्यांनी गुगल सर्चमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. जगभरातील 64 देशातील लोकांनी या जपानीच्या कंपनीच्या गाड्या गुगलवर शोधण्यात सर्वात जास्त रस दाखवला. जगात दुसरा नंबर लागला तो Teslaचा… टेस्लानं यंदा दुसरं स्थान मिळवून सगळ्यांना चकीत केलं. टेस्लाची प्रसिद्धी तब्बल 29 देशांमध्ये पहायला मिळाली. त्यांची Model Y ही सर्वाधिक प्रसिद्ध कार ठरली.

Teslaने यंदा BMWवर केली मात-

गुगल सर्चमध्ये गाड्यांच्या कंपन्यांमध्ये तिसरा नंबर मिळाला तो BMW कंपनीला… बीएमडब्ल्यू ही जर्मन कंपनी यंदा एक स्थान खाली आली आहे. 26 देशांमध्ये BMWची हवा पहायला मिळाली मात्र यंदा Tesleने प्रसिद्धीच्या बाबतीत BMWला मागे टाकलेलं पहायला मिळालं.

जगात गाड्यांच्या प्रसिद्धीमध्ये चौथ्या नंबरवर Audi तर पाचव्या नंबरवर Mercedesचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑडी सर्च केलेल्या देशांची संख्या कमी झाली. गेल्यावर्षी 9 देशांमध्ये सर्च केली गेलेली ऑडी यंदा फक्त 7 देशांमध्येच सर्च केली गेली. दुसरीकडे मर्सिडीजची सुद्धा जादू कमी झालेली पाहायला मिळाली. यंदा मर्सिडीज सुद्धा हवी तेवढी सर्च केलेली पहायला मिळाली नाही.

भारतात कोणत्या कंपनीच्या गाड्या जास्त सर्च झाल्या?

भारताचा विचार केला तर भारतात मारुती सुझुकी ही सर्वात जास्त गाड्या विकणारी कंपनी आहे. याच कारणामुळे अनेकांना वाटेल की भारतात Maruti Suzukiच्या गाड्या सर्वात जास्त सर्च केल्या गेल्या असतील, मात्र हाती आलेल्या आकडेवारीनूसार हा अंदाज चुकीचा आहे. दुसरीकडे काही लोकांना वाटेल Tataचा नंबर असेल मात्र तसंही नाही, भारतातील लोकांनी यंदा Hyundaiच्या गाड्या सर्वात जास्त सर्च केल्या.

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर सुद्धा नाही. भारतात सर्च केलेल्या गाड्यांमध्ये दुसऱ्या नंबरवर किया आहे तर तिसऱ्या नंबरवर भारतातील लोकांनी Teslaच्या गाड्या सर्च केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक गाड्या मारुती सुझुकीच्या खपत असतील तरी भारतातील लोकांनी वेगळ्याच गाड्या सर्च केल्या आहेत.

News Title: maruti suzuki tata or hyundai Top Google Ranking Car Brand In India

महत्त्वाच्या बातम्या-

Elvish Yadav मित्राला मारहाण होत असताना पळून गेला?, वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी नेमकं काय घडलं???

Manoj Jarange Patil | 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषण, मनोज जरांगे पाटलांनी सांगितला सगळा प्लॅन

Manoj Jarange | सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Maratha Reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा!, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करणार?