Entertainment News | “माझा होशील ना”फेम अभिनेत्रीनं दिला मोठा धक्का, ‘या’ व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार!

Entertainment News | मराठी सिनेसृष्टितील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहिण गौतमी सुद्धा तिच्या पाठोपाठ सिनेसृष्टीत स्थिरावली आहे. बहिणीसोबत तीने सुद्धा सिनेसृष्टीत चांगलेच नाव कमावले आहे. ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेअर करत असते. मृण्मयी आणि गौतमी या दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकरी आवडीने बघतात. गौतमीने छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या मनात घर केलं. दरम्यान, गौतमीने तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर दिली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

“माझा होशील ना” या मालिकेतून घराघरात पोहचणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे लग्नबंधनात अडकणार आहे. गौतमीनं एक खास फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत हे खास क्षण शेअर केले आहेत. गौतमीनं आपल्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Entertainment News)

नात्याबदल काहीच माहित नव्हतं-

अभिनेत्री गौतमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. मात्र, तिच्या या नात्याबदल तिने कधीच खुलासा केला नाही, त्यामुळे तिच्या या नात्याबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं. अशा परिस्थितीत गौतमीने सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. तीने थेट आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, आता गौतमी कुणासोबत लग्न करतेय?, याच्या फारच चर्चा रंगल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी गौतमी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा एका लग्नातला फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच दोघांच्या नात्याची चर्चा सुरूवात झाली होती. पण दोघांनीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नाही.(Entertainment News)

कोण आहे स्वानंद तेंडुलकर?

गौतमी स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न करणार आहे. स्वानंद भाडिपा या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा व्हाइस प्रेसिडंट म्हणून काम पाहतोय. डिजिटल स्पेसमध्ये मराठी कंटेट तयार करणारी भाडिपा ही आघाडीची कंपनी आहे.

भाडिपाच्या वेब सीरिज, स्टँडअप कॉमेडी विशेष लोकप्रिय आहे. दरम्यान स्वानंदही एक कंटेंट क्रिएटर असून सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होत असतात.

News Title : entertainment news actress getting married

महत्त्वाच्या बातम्या-

Elvish Yadav मित्राला मारहाण होत असताना पळून गेला?, वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी नेमकं काय घडलं???

Manoj Jarange Patil | 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषण, मनोज जरांगे पाटलांनी सांगितला सगळा प्लॅन

Manoj Jarange | सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Maratha Reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा!, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करणार?