Pune-Ahmednagar | पुणे-नगर रस्त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune-Ahmednagar News | पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी या भागातील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळं हा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही. वाघोलीपासून-शिरुरपर्यंत उड्डाणपुलाची घोषणा करण्यात आली मात्र यामध्ये अद्याप फार मोठी घडामोड घडलेली नाही, अशात या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCP Ajit Pawar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी नेमकी काय घोषणा केली?

नगर रस्त्यावरील (Nagar Road) वाहतूककोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वाघोलीपासून ते थेट शिरुरपर्यंत उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना आणखी फायदा व्हावा यासाठी या उड्डाणपुलाची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. आता हा उड्डाणपूल वाघोलीपासून नव्हे ते थेट पुण्यातील रामवाडीपासून(Ramwadi) सुरु होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुणे-नगर(Pune-Ahmednagar) रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्यावेळी या प्रश्नावर लवकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सभागृहात दिली होती. त्याअनुषंगानेच पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी एक बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अभिजीत आवटे उपस्थित होते.

नेमकी काय काय झाली चर्चा?-

नगर रस्त्यावर वाघोलीपासून ते शिरुरपर्यंत(Shirur) दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल रामवाडीपासून सुरु व्हावा, अशी सूचना काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी केली होती. या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली आहे तसेच याचा प्रकल्प आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता या प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी चार किलोमीटरने वाढणार आहे.

नगर रस्त्याला लागून असलेल्या भागांमध्ये पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर व्हावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. शिवणे(Shivane) ते खराडी(Kharadi) हा रस्ता वडगावशेरी(Vadgaon Sheri) मतदारसंघात रखडला आहे. याठिकाणी बाकी असलेलं भूसंपादनाचं काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील निविदा प्रकिया तातडीने राबवण्याचा आदेश देखील अजित पवार यांनी दिला आहे.

ही बातमी वाचली का?: Pune-PCMC News | मनस्ताप नको असेल तर आत्ताच वाचा!, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठा बदल

नगर रोडवरील उड्डाणपूल होणार तरी कधी?-

नगर रस्त्यावर (Pune Ahmednagar) उड्डाणपूल करण्याची घोषणा होऊन मोठा काळ लोटला आहे, मात्र प्रत्यक्षात यासंदर्भातील कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. कामाला सुरुवात झाली तर आणखी मोठा वेळ यामध्ये जाणार आहे, त्यातच कामामुळे देखील काही वर्षे या भागातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे नुसत्या घोषणा नको, कामाला कधी सुरुवात करणार?, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.

News Title: Pune Ahmednagar road flyover important update

महत्त्वाच्या बातम्या-

Entertainment News | “माझा होशील ना”फेम अभिनेत्रीनं दिला मोठा धक्का, ‘या’ व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार!

Maruti Suzuki, TATA की Hyundai?, 2023 मध्ये भारतीयांनी Googleवर कोणत्या कंपनीच्या गाड्या सर्वात जास्त शोधल्या?

Elvish Yadav मित्राला मारहाण होत असताना पळून गेला?, वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी नेमकं काय घडलं???

Manoj Jarange Patil | 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषण, मनोज जरांगे पाटलांनी सांगितला सगळा प्लॅन

Manoj Jarange | सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा