एक महिन्यातच पैसा डबल, ‘या’ शेअरने दिली छप्परफाड कमाई

भगवान देता है तो छप्पर फाडके देता है असंच काहीसं झालंय मल्टिबॅगर परतावा मिळवणाऱ्या गुंतवणुकदारांसोबत… कारण या गुंतवणुकदारांनी अवघ्या एक महिन्यात छप्परफाड कमाई केलीये. बोलेतो एक महिनेमे पैसा डबल.

काही कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणुकदारांना चांगलाच फायदा मिळवून दिलाय. या मल्टिबॅगर शेअर्समध्ये तुम्हीपण पैसे गुंतवले असते तर आज तुम्हीपण मालामाल झाला असता. हे मल्टिबॅगर शेअर रोज नवा उच्चांक तयार करतायत. या व्हिडीओत आपण याच शेअर्सबद्दल जाणून घेऊ.

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना मल्टिबॅगर स्टॉकने दिलेला हा परतावा जाणून घेण्याआधी मल्टिबॅगर स्टॉक म्हणजे नेमकं काय ते आधी आपण जाणून घेऊ.

शेअर मार्केटमध्ये सध्या असे अनेक शेअर आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसा कमावून दिलाय.तर यातले काही शेअर असे आहेत जे आपल्या मूळ किमतीच्या दुप्पट तिप्पटच नाही पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त पटीच्या किमतीचे झालेत. हे असेच शेअर जे मूळ किमतीच्या अनेक पटीनं वाढतात त्या शेअर्सना आपण मल्टिबॅगर स्टॉक म्हणतो.

आता सप्तर्षी अॅग्रो इंडस्ट्रीज, इवान्स इलेक्ट्रिक आणि वेस्ट लीजर रिसॉर्ट्स या तीन मल्टिबॅगर स्टॉक्सनं त्यांच्या गुंतवणुकदारांना अक्षरश: मालामाल केलंय.

1 नोव्हेंबर रोजी सप्तर्षी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत फक्त 13.49 रूपये होती. पण या महिन्याभरात सप्तर्षी अॅग्रोजच्या शेअर्सची धडाकेबाज विक्रि झालीये आणि शेअर्सने तब्बल 127.59 टक्क्यांची उडी घेतलीये. 28 नोव्हेंबर रोजी सप्तर्षी अॅग्रोच्या शेअर्सची किंमत 29.27 रूपये आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्समध्ये 106.67 टक्क्यांनी वाढ झालीये आहे. या शेअर्सची गेल्या 52 आठवड्यांची उच्च पातळी सध्या 29.27 रुपये आहे.

तर दुसरीकडे इव्हान्स इलेक्ट्रिक शेअर्सच्या गुंतवणुकदारांना पण चांगलाच धनलाभ झालाय. महिन्याच्या सरूवातीला 88 रूपये किंमत असलेले इव्हान्स कंपनीचे शेअर्स आता तब्बल 254.14 रूपयांवर जाऊन पोहोचलेत. या शेअरने 1 नोव्हेंबर पासून 175 टक्क्यांनी झेप घेतली आणि गुंतवणुकदारांना चांगलच श्रीमंत केलं.

सप्तर्षी अॅग्रो आणि इव्हान्स इलेक्ट्रिकसोबत वेस्ट लीझर रिसॉर्ट्स पण मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीतय. वेस्ट लीझर शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अप्पर सर्किट दाखवतंय. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकचा 261.95 रूपयांवर व्यवसाय सुरू होता. आणि 28 नोव्हेंबर रोजी वेस्ट लीझर रिसॉर्ट शेअरची किंमत 598.25 रूपये इतकी आहे. वेस्ट लीझर रिसॉर्टच्या शेअरने महिन्याभरातच 117 टक्क्यांनी मुसंडी मारली आणि आज हेच सगळे शेअर त्यांच्या गुंतवणुकदारांना भलामोठा फायदा करून देतायत.

कमीत कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवणं सोपं वाटत असलं तरी आहे अवघड. शेअर मार्केटमध्ये जेवढा नफा आणि पैसा असतो तेवढीच नुकसानाची भीती पण असतेच.

त्यामुळे शेवटी एक महत्त्वाची सूचना, शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही एक जोखीम असते, थोडक्यात काय तर कुठलाही स्टॉक घेण्याचा सल्ला आम्ही देत नाही, हा व्हिडीओ फक्त एक माहितीपर आणि शैक्षणिकदृष्ट्या तयार केलेला आहे. कुठलीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला एकदा नक्की घ्या, किंवा स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More