आता बटाट्यात देखील भेसळ; खरा बटाटा असा ओळखा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अलीकडे बाजारात बटाट्याची (Potato) भेसळ उघड पडली होती. हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ असते. या भेसळीमुळं अनेक भयंकर प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. आता भाज्यामध्ये देखील भेसळ होत असल्याचं दिसून येत आहे. बाजारात बटाट्याची भेसळ सुरु आहे.

भाज्यांची लागवड कुठं,कशी केली जाते याची कल्पना नागरिकांना नसते. ती भाजी (vegetables) कुठल्या भागात, कोणत्या पाण्यात पिकवली जाते हे प्रश्न जनसामान्यांना पडतात. मात्र लोक कोणती भाजी खरी-खोटी हे ठरवू शकत नाही. अनेकदा या भाज्या मात्र आरोग्यासाठी घातक ठरतात.

बाजारात दोन प्रकारचे बटाटे (potato) मिळतात. एक चंद्रमुखी तर दुसरा हेमांगिनी किंवा हेमालिनी हे आहेत. यातील चंद्रमुखी बटाटा चवीसाठी उत्तम आणि आरोग्यासाठी योग्य असल्याचं कृषी सहकारी समितीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. हा चंद्रमुखी बटाटा बाजारात साधारणता 20 ते 25 रुपये प्रतिकिलो विकला जातो.

हेमांगिनी किंवा हेमालिनी बटाट्याबाबतीत सांगायचं झाल्यास हा बटाटा भेसळयुक्त आहे. हा हायब्रीड (Hybrid) आणि भेसळयुक्त असतो. हा बटाटा अगदी कमी किमतीत विकला जातो. 10 ते 15 रुपये किलो असा हा बटाटा विकला जात आहे. याचं कारण म्हणजे या बटाट्याची लागवड सोप्पी आणि कमी खर्चितक असते, त्याची चव चांगली नसते. हे बटाटे आरोग्यास पोषकदेखील नसतात. यामुळे आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कृषी मार्गदर्शक यांच्या माहितीनुसार, या दोन्ही बटाट्यामधील फरक लगेचच समजून येतो. यादोन्हीमधील फरक अगदी नगण्य आहे. यातील मुख्य फरक हा बटाटा सोलल्यावर दिसून येतो. चंद्रमुखी बटाटा सोलल्यावर त्याचा रंग किंचित मातकट रंगाचा असतो तर दुसरीकडं हेमांगिनी बटाटा पाढऱ्या रंगाचा असतो. हेमांगिनी बटाटा शिजण्यास (to cook) जास्त वेळ लागतो. यावरुन देखील तुम्ही योग्य बटाटा ओळखू शकता.

महत्त्वाच्या बातम्या