“पुणे शहरात आता टू-व्हिलर चालवायला सुद्धा भीती वाटत आहे”

Pune News | गेल्या काही दिवसांआधी पुणे शहराच्या कल्याणीनगर येथे रविवारी अल्पवयीन कार चालकाने दोघांना भररस्त्यावर उडवलं आहे. अल्पवयीन कार चालकाचं नाव हे वेदांत अग्रवाल असून तो 17 वर्षांचा आहे. त्याच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवालला संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाला आता अनेक पद्धतीने वेगळी वळणं प्राप्त होऊ लागली आहेत. काल विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत पुणे वाहतुकीच्या, नियमांवर, महागड्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता समाजकारणात सक्रिय असलेल्या तृप्ती देसाई यांनी याप्रकरणात आता उडी घेतली आहे. (Pune News)

तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहित त्यांनी वाहतुकीवर भाष्य केलं आहे. पुणे शहरामध्ये देखील आता टू-व्हिलर वाहन चालवण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच विशाल अग्रवालच्या जामीनावर देखील भाष्य केलं आहे. (Pune News)

तृप्ती देसाईंची फेसबुक पोस्ट

समाजकारणात सक्रिय असलेल्या तृप्ती देसाई यांनी पुणे पोर्श गाडीच्या आपघाताप्रकरणी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. “पुणे शहरात आता टू व्हीलर चालवायला ही भीती वाटत आहे, अचानक कोणीतरी श्रीमंतांची मुले येतील आणि सर्वसामान्यांना उडवून जातील… 12 तासाच्या आत जामिनावर सुटून घरी येतील” अशी फेसबुक पोस्ट केली आहे.

आरोपी मद्यपान करून चारचाकी वाहन चालवत असल्याचा पुरावा आता समोर आला आहे. पुण्यात त्याने मद्यप्राशन केलं तिथला सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामध्ये अल्पवयीन चारचाकी चालवणारा वेदांत हा सीसीटीव्हीमध्ये मद्यप्राशन करताना दिसत आहे. त्यावर वेदांतचा अल्कोहोल रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. एकाबाजूला सीसीटीव्हीमध्ये वेदांत हा अल्कोहोलचं सेवन करताना दिसत आहे तर दुसरीकडे अल्कोहोल रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समजतंय. (Pune News)

काय होत्या जामीनाच्या अटी

तसेच आता जमीनप्रकरणी काही आश्चर्यकारक अटी आता समोर आल्या आहेत. अल्पवयीन आरोपी पुराव्याशी छेडछाड करणार नाही.

अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची हमी दिली आहे. आजोबांनी अभ्यासावर लक्षकेंद्रीत करेल अशी हमी दिली आहे.

अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ञांकडे उपचार करावे लागणार आहेत.

अल्पवयीन आरोपीने अपघात केल्यास अपघात केलेल्यांना आरोपीने मदत करावी अशी अट आहे.

या मुलाला पुन्हा ज्युवीनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दारु पिऊन कार चालवल्याबद्दल या अल्पवयीन आरोपीवर 185 कलमाच्या अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या गुन्ह्यावर 185 हे कलम वाढवलं आहे. हे कलम नव्याने दाखल करण्यात आलं आहे. (Pune News)

News Title – Pune News Trupti Desai Porsche Car Accident Facebook Post Viral

महत्त्वाच्या बातम्या

पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ

पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

‘माझ्या मुलाने असं काही केलं असतं तरी…’; पुण्यातील अपघातावर अजित पवार स्पष्टच बोलले

हातात दारूचा ग्लास अन्…; अपघाताआधीचा पबमधील व्हिडीओ आला समोर