Rinku Singh Team India | भारताचा बडा धमाका; रिंकू सिंग घेतोय धोनीची ‘ही’ जागा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | रिंकू सिंग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या (टी-20 T20 World Cup)  मध्ये त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. रिंकू फलंदाजीला आली तेव्हा फक्त 14 चेंडू खेळायचे बाकी होते. रिंकूने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. स्ट्राइक रेट 344 होता. त्याने 9 पैकी 6 चेंडूत चौकार ठोकले. अशा स्थितीत टीम इंडियाला आणखी एक मजबूत फिनिशर मिळाला आहे का? अशी चर्चा सुरूये.

Rinku Singh proved that he is Mr. Finisher

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला आता फक्त 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. याशिवाय आयपीएल 2024 देखील आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

क्रिकेट विश्वचषक फायनलमधील पराभवाची निराशा विसरून इशानने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. तर सूर्या, ऋतुराज आणि यशस्वी यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावलं आहे. या सर्वांमध्ये ज्या भारतीय खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत आहे तो म्हणजे रिंकू सिंग. रिंकूने दोन्ही सामन्यात फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. पहिल्या सामन्यात रिंकूने 14 चेंडूंचा सामना करत नाबाद 22 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात रिंकूने 9 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 4 चौकार लगावले.

रिंकूच्या फलंदाजीत धोनी-युवीची झलक

शेवटच्या षटकात भारत संकटात सापडला असताना रिंकूने माजी कर्णधार धोनीप्रमाणे स्वत:ला खूप शांत ठेवलं आणि सामना जिंकून दिला. त्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी होती, त्यानंतर रिंकूने षटकार ठोकला. मात्र तो षटकार नो-बॉल असल्याने वैध ठरला नाही.

26 वर्षीय रिंकू सिंगचा टी-20 इंटरनॅशनलमधील स्ट्राइक रेट 216.94 आहे, यावरून धोनी-युवराजप्रमाणे भारताचा पुढील फिनिशर बनण्याची पूर्ण क्षमता असल्याचं दिसून येतं. T20 विश्वचषक 2024 साठी जास्त वेळ शिल्लक नाही. त्यामुळे रिंकूचा फॉर्म कायम राहिल्यास आगामी T20 विश्वचषक स्पर्धेत तो भारतासाठी एक्सफॅक्टर ठरू शकतो.
रिंकू सिंगने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये चांगली कामगिरी केली होती.

आयपीएल 2023 मध्ये रिंकूने एक अशी कामगिरी केली होती ज्याची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, रिंकूने शेवटच्या षटकात यश दयालच्या चेंडूवर सलग षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Dry Lips Home Remedy | आता हिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ, फक्त वापरा हे सोपे उपाय!

Samsung Galaxy | 50MP Camera, 5000mAh बॅटरी, किंमत 10 हजारांपेक्षा कमी, या फोनची बाजारात क्रेझ

Hasin Jahan च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री; स्वतः दिली कबुली

IPL 2024 | Gujrat Titansचे धक्क्यावर धक्के, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू नवा कॅप्टन

IPL 2024 | गुजरात-मुंबईमध्ये Hardik Pandyaचा लफडा, खरी लॉटरी लागली विराटच्या RCBला!